कुपोषणमुक्तीसाठी आरोग्य विभागाचा अजब फंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 05:00 PM2018-09-17T17:00:41+5:302018-09-17T17:12:14+5:30
नांदूरवैद्य येथे कुपोषित बालके सुदृढ करण्यासाठी आरोग्य महिला व बालविकास विभागाच्या वतीने बालके सुदृढ करण्यासाठी अजब फंडा वापरण्यात आला आहे. नांदूरवैद्य ग्रामपंचायतीमार्फत कुपोषित बालकांच्या पालकांना गावठी कोंबड्यांचे वाटप करण्यात आले आहे.
कुपोषित बालकांच्या रोजच्या आहारात प्रोटीनयुक्त आहाराचा समावेश असावा यासाठी त्या त्या गावातील ग्रामपंचायतीमार्पत कुपोषित बालकांना अंडी देणा-या प्रत्येकी दोन गावठी कोंबड्या कुपोषित बालकांच्या पालकांना देण्यात आल्या आहेत. ग्रामअधिकारी किरण आहिरे व इगतपुरी पंचायत समितीचे पशूधन विकास सहायक अधिकारी डॉ. तायडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोंबड्यांचे वितरण करण्यात आले. इगतपुरी तालुक्यात या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात कुपोषित बालकांची संख्या मोठयÞा प्रमाणावर असल्याने त्यांचे समूळ उच्चाटन करु न ही बालके सुदृढ करण्यासाठी आरोग्य, महिला व बालविकास विभागाने कंबर कसली आहे. एका कोंबडीचा अंडी देण्याचा हंगाम संपल्यानंतर याकाळात मुलांच्या आहारातील अंडी कमी व्हायला नकोत यासाठी एकाचवेळी दोन कोंबड्या देण्यात आल्या आहेत. याप्रसंगी रोहिदास सायखेडे, अंगणवाडी सेविका सुमन मुसळे, सुनिता मुसळे, मोनिका सोनवणे, माधव कर्पे, मारु ती डोळस, दिपक मुसळे, केशव मुसळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.