पाटणेत आरोग्य मार्गदर्शन शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 11:38 PM2018-03-04T23:38:43+5:302018-03-04T23:38:43+5:30
संगमेश्वर : ग्रामीण भागात अनेक औषधी वनस्पतीद्वारे विविध आजार बंद होऊ शकतात.
संगमेश्वर : ग्रामीण भागात अनेक औषधी वनस्पतीद्वारे विविध आजार बंद होऊ शकतात. यासाठी सामाजिक संस्थांनी जबाबदारी घेऊन औषधी वनस्पतीची जास्तीत जास्त लागवड करण्याचे आवाहन आयुषचे सहाय्यक संचालक डॉ. व्यंकट पी. धर्माधिकारी यांनी पाटणे येथे आयोजित कार्यक्रमात केले. मोहंमदीया तिब्बिया युनानी मेडिकल कॉलेज अस्सायर हॉस्पिटल मन्सुरा यांचे संयुक्त विद्यमाने आरोग्य मार्गदर्शन शिबिर मालेगाव तालुक्यातील पाटण येथे झाले. यावेळी डॉ. धर्माधिकारी यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. मन्सुरा मेडिकल कॉलेजच्या वतीने दिल्या जाणाºया आरोग्य सुविधांची माहिती डॉ. वसीम अहमद व डॉ. साजीद अली यांनी दिली. प्राथमिक शाळेतील १०४ विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी यावेळी करण्यात आली. डॉ. मिनहाज सय्यद, डॉ. शकील, डॉ. सादीय्या खान, डॉ. मोहंमद सोहेल आदींनी आरोग्य तपासणीत सहभाग घेतला. कार्यक्रमास पाटणे गावाच्या सरपंच राहुलाबाई अहिर, महिला बचत गटाच्या बबीता बागुल यांच्यासह ग्रामस्थ, कार्यकर्ते उपस्थित होते. ग्रामविकास अधिकारी एस. बी. सुरंजे यांनी सूत्रसंचालन केले.