आदिवासी वस्त्यांशेजारील कचऱ्यामुळे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 07:01 PM2019-07-03T19:01:27+5:302019-07-03T19:02:12+5:30

तळवाडे दिगर : येथील भवाडा रोड लगतच्या आदिवासी वस्तींसह दसाणा रोड शेजारी राहणा-या दलित वस्तीशेजारी साचलेल्या कचरा व उकिरड्यांमुळे तसेच ग्रामपंचायतीद्वारा बांधण्यात आलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

 Health hazard by tribal waste trash | आदिवासी वस्त्यांशेजारील कचऱ्यामुळे आरोग्य धोक्यात

आदिवासी वस्त्यांशेजारील कचऱ्यामुळे आरोग्य धोक्यात

Next

एकीकडे देशभरात स्वच्छतेसंदर्भात आग्रही भूमिका घेतली जात असताना आम्ही स्वातंत्र्यात आहोत की पारतंत्र्यात असा सवाल संतप्त नागरिकांकडून विचारला जात आहे. लोकांना भेडसावणाºया व त्रस्त करणा-या या समस्येचे निराकरण करण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने एकप्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या स्वच्छ भारत अभियानाला हरताळ फासण्याचे काम ग्रामपंचायतीकडून केले जात असल्याचा आरोप दलित आदिवासी बांधवांकडून केला जात आहे. गावामध्ये दर गुरु वारी आठवडे बाजार भरतो. येथील भवाडा रोड लगत मोठ्या प्रमाणात मांसाहारी पदार्थांची विक्र ी होते. रस्त्याला असलेल्या गुरांच्या दवाखान्याजवळ तसेच आदीवासी वस्तीलगत व्यावसायिकांकडून मांसाहारी पदार्थांचे अवशेष फेकले जातात. यामुळे या भागात प्रचंड प्रमाणात दुर्गंधी येते.याबरोबरच दसाणा रोड लगत असलेल्या दलित वस्तीजवळही ग्रामपंचायतीने सार्वजनिक संडास बांधले असून त्याठिकाणी पाण्याची व्यवस्था नसल्याने तसेच नियमित साफसफाई होत नसल्याने तेथेही मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली असते. त्यामुळे नागरिकांना त्या भागात जगणे असह्य झाले आहे. या दोन्ही रस्त्यावरून दिवसभर वाहनांची, पादचाऱ्यांची तसेच शाळकरी मुलांची वर्दळ असते. त्यांनाही या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहते. साचलेल्या कच-यामध्ये पाणी साचल्यानंतर दुर्गंधीत भर पडत असून डासांचा उपद्रव वाढला आहे. यामुळे मलेरिया, डेंग्यूसारख्या साथीच्या आजारांची लागण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने ग्रामपंचायतीने गावाचे आरोग्य डोळ्यासमोर ठेवून संपूर्ण गावभर स्वच्छता मोहीम राबवावी अशी मागणी केली जात आहे.

Web Title:  Health hazard by tribal waste trash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.