आरोग्य अधिकाऱ्यांच्या दालनाला ‘कॅमे-या’चे कवच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 08:12 PM2020-01-20T20:12:38+5:302020-01-20T20:12:58+5:30
तालुका वैद्यकीय अधिका-याकडे डॉ. डेकाटे यांनी पैसे मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे करण्यात आल्याने डेकाटे यांच्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सापळाही रचला होता. त्यात डेकाटे प्रत्यक्ष सापळ्यात अडकले नसले तरी
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : आठ महिन्यांपूर्वी आरोग्य विभागातील उत्कृष्ट काम करणा-या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सत्कार समारंभाच्या निमित्ताआड तालुका वैद्यकीय अधिका-याकडे लाच मागितल्याच्या कथित आरोपानंतर गुन्हा दाखल झालेले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी या घटनेनंतर झालेली ससेहोलपट व आरोग्य खात्याची बदनामी टाळण्यासाठी आरोग्य विभागात सीसीटीव्ही कॅमे-याचे कवच बसविल्याने सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे. विशेष म्हणजे डेकाटे यांनी स्वत:च्या दालनातदेखील एक कॅमेरा बसवून स्वत:लाही त्यापासून दूर ठेवलेले नाही.
जून महिन्यात सदरचा प्रकार घडला होता. तालुका वैद्यकीय अधिका-याकडे डॉ. डेकाटे यांनी पैसे मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे करण्यात आल्याने डेकाटे यांच्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सापळाही रचला होता. त्यात डेकाटे प्रत्यक्ष सापळ्यात अडकले नसले तरी, त्यांनी पैसे मागितल्याचे ध्वनिमुद्रित पुरावा हाती लागल्याने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र त्यांना अटक होवू शकली नाही. आरोग्य विभागात उत्कृष्ट काम करणा-या अधिकारी, कर्मचा-यांच्या सत्कार सोहळ्यासाठी येणा-या खर्चाची तजवीज करण्यासाठीच वर्गणी गोळा केली जात असल्याचे डेकाटे यांचे म्हणणे होते. डॉ. डेकाटे यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केल्यानंतर साधारणत: चार ते सहा महिन्यांनी ते जिल्हा परिषदेच्या सेवेत पुन्हा सहभागी झाले. या साºया प्रकारातून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला बदनामीला सामोरे जावे लागले, तर खुद्द डॉ. डेकाटे यांनाही मनस्ताप झाला. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणीही सुरू केली आहे. आरोग्य विभागात येणाºया प्रत्येक व्यक्तीची नोंद ठेवण्यासाठी आरोग्य विभागाच्या प्रवेशद्वारावरच कॅमेरा लावण्यात आला असून, कार्यालयातही महत्त्वाचे टेबल एकाच टप्प्यात येतील अशा पद्धतीने कॅमे-याची ‘नजर’ ठेवण्यात आली आहे. डॉ. डेकाटे यांनी आपल्या स्वत:च्या दालनातदेखील कॅमेरा कार्यान्वित ठेवला असून, दालनातील सा-या बारिकसारिक गोष्टीची त्याचबरोबर होणा-या चर्चेचीदेखील दखल त्याद्वारे घेण्यात येईल. ही सर्व कॅमेरे व त्याचे नियंत्रण डेकाटे यांनी आपल्याकडेच ठेवले आहे. डेकाटे यांनी कॅमे-याचा खर्च शासनाच्या कोणत्या हेडखाली केला हे समजू शकले नसले तरी, आरोग्य विभागातील कर्मचारी सोमवारी टेबलावर व्यवस्थित हजर असल्याचे आढळून आले.