आदिवासी माता-बालकांच्या आरोग्याचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 01:03 AM2018-10-12T01:03:49+5:302018-10-12T01:04:22+5:30
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती अपर्णा खोसकर यांनी आदिवासी भागातील अंगणवाडी, बालक विकास प्रकल्प आणि प्राथमिक आरोग्य केंद्रास अचानक भेटी देऊन गरोदर माता आणि बालकांच्या आरोग्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांना आरोग्याच्या नियोजनाबाबत अनेक त्रुटी आढळल्याने त्यांनी याबाबत संबंधिताना कामकाज सुधारण्याची सूचना केली.
नाशिक : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती अपर्णा खोसकर यांनी आदिवासी भागातील अंगणवाडी, बालक विकास प्रकल्प आणि प्राथमिक आरोग्य केंद्रास अचानक भेटी देऊन गरोदर माता आणि बालकांच्या आरोग्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांना आरोग्याच्या नियोजनाबाबत अनेक त्रुटी आढळल्याने त्यांनी याबाबत संबंधिताना कामकाज सुधारण्याची सूचना केली.
सभापती खोसकर यांनी सुरगाणा तालुक्यातील जि. प. सदस्य ज्योती जाधव, सुरगाणा प्रकल्पाचे बालविकास प्रकल्प अधिकारी संदीप भिंगारे, बाºहे प्रकल्पाचे बालविकास अधिकारी समाधान नागने यांच्या समवेत आदिवासी भागातील सुरगाणा तालुक्यातील अतिदुर्गम प्रतापगढ, अलंगुण, धोडांबे, कोठुला येथील अंगणवाडी केंद्र, उंबरठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास अचानक भेट दिली. तसेच सुरगाणा व बाºहे येथील एकात्मिक बालविकास सेवायोजना प्रकल्प कार्यालय भेट देऊन पर्यवेक्षिका कामकाज आढावा बैठक घेतली.
पर्यवेक्षकांनी अंगणवाडी
केद्रांना नियमित भेटी देऊन कामकाजात सुधारणा करावी अन्यथा कारवाई करावी लागेल, असा इशारा दिला.