महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारावरच आरोग्य सुरक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 11:40 PM2020-08-29T23:40:40+5:302020-08-30T01:17:52+5:30

नाशिक : शासनाने शाळा महाविद्यालये सुरू करण्यास अद्याप अनुमती दिली नसली तरी अनेक परीक्षांचे निकाल लागल्याने शहरातील महाविद्यालयांमध्ये गर्दी वाढू लागली आहे. मात्र, प्रत्येक महाविद्यालयात प्रवेशद्वारापासूनच आरोग्य सुरक्षिततेची विशेष काळजी घेतली जात आहे. सॅनिटायझर आणि मास्क शिवाय प्रवेशच दिला जात नाही.

Health security at the entrance of colleges | महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारावरच आरोग्य सुरक्षा

बीवायके महाविद्यालय.

Next
ठळक मुद्देतपमानाची तपासणी । सॅनिटायझर आणि मास्कशिवाय प्रवेशच दिला जात नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शासनाने शाळा महाविद्यालये सुरू करण्यास अद्याप अनुमती दिली नसली तरी अनेक परीक्षांचे निकाल लागल्याने शहरातील महाविद्यालयांमध्ये गर्दी वाढू लागली आहे. मात्र, प्रत्येक महाविद्यालयात प्रवेशद्वारापासूनच आरोग्य सुरक्षिततेची विशेष काळजी
घेतली जात आहे. सॅनिटायझर आणि मास्क शिवाय प्रवेशच दिला जात नाही.
कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. किंबहुना नाशिक शहरात ते वाढतच असून त्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयात विद्यार्थ्यांची वर्दळ वाढली असली तरी संस्थाचालकांनी विशेष काळजी घेतली आहे. प्रवेशव्दाराजवळ सॅनिटायझर असून, हात निर्जंतुक केल्याशिवाय तसेच मास्कशिवाय प्रवेशच दिला जात नाही. अनेक महाविद्यालयांनी काळजी घेताना कामाशिवाय कार्यालयात येऊच नये, असे आवाहन केले आहे.निकालानंतर होऊ लागली गर्दी
मार्च महिन्यात कोरोनाचे संकट उद्भवल्यानंतर शाळा-महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. ते सुरू करण्यास अद्याप अनुमती नाही. पदवी परीक्षांचा घोळ तर अद्याप सुरूच आहे तर अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे शाळा -महाविद्यालयांचे निकाल जाहीर करण्यात आले असून, सध्या आॅनलाइन शिक्षणावर भर देण्यात आला आहे. मात्र, महाविद्यालये बंद असली तरी मध्यंतरी दहावी -बारावी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर महाविद्यालयात प्रवेशासाठी तसेच शैक्षणिक कारणांसाठी दाखले घेणे आणि अन्य कामांसाठी मात्र, दाखले आणि कागदपत्रांची जुळवाजुळव विद्यार्थी करीत आहेत. त्यामुळे शाळा -महाविद्यालयात गर्दी होऊ लागली आहे.

Web Title: Health security at the entrance of colleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.