कोरोनाविरोधी खबरदारीसाठी आरोग्य पथके तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 11:21 PM2020-03-25T23:21:53+5:302020-03-25T23:22:40+5:30

कोरोनाबाबत देशासह राज्यभरात दक्षतेचा इशारा देण्यात आला असून, खबरदारीचा उपाय म्हणून निर्बंध घालण्यात येऊन संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय व जनजागृतीसाठी कळवण उपजिल्हा रुग्णालय, सुरगाणा व अभोणा ग्रामीण रुग्णालयासह कळवण, सुरगाणा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रात आरोग्य पथके तैनात केली आहेत.

Health squads deployed to guard against coronas | कोरोनाविरोधी खबरदारीसाठी आरोग्य पथके तैनात

खेडगाव येथे कोरोनासंदर्भात जनजागृती करताना रवींद्र सपकाळे व कर्मचारी.

Next

कळवण : कोरोनाबाबत देशासह राज्यभरात दक्षतेचा इशारा देण्यात आला असून, खबरदारीचा उपाय म्हणून निर्बंध घालण्यात येऊन संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय व जनजागृतीसाठी कळवण उपजिल्हा रुग्णालय, सुरगाणा व अभोणा ग्रामीण रुग्णालयासह कळवण, सुरगाणा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रात आरोग्य पथके तैनात केली आहेत.
एकजुटीने कोरोनाचा मुकाबला करू, तुमची आमची जबाबदारी पार पडण्याची वेळ आली असल्यामुळे घरातून बाहेर पडू नका, असे आवाहन आमदार नितीन पवार यांनी केले आहे. जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी प्रत्येक तालुक्यातील आरोग्य विभागास कडक सूचना दिल्या आहेत. कळवण उपजिल्हा रुग्णालयात कोरोना प्रतिबंध व नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत खैरे यांनी दिली. कळवण उपजिल्हा रुग्णालय, सुरगाणा व अभोणा ग्रामीण रुग्णालयासह ग्रामीण व आदिवासी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात सामान्य रुग्ण उपचार घेतात. प्राथमिक आरोग्य केंद्रांची आरोग्य यंत्रणा ग्रामीण व आदिवासी भागात कोरोनासंदर्भात काळजी घेण्याबाबत गावोगावी जनजागृती करीत आहे. कळवण उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना प्रतिबंधक व नियंत्रक कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
रुग्णवाहिकाही सज्ज
जिल्हा आरोग्य विभागाकडून या कक्षासाठी आवश्यक असलेला औषधपुरवठा करण्यात आला आहे. सुदैवाने तालुक्यात अद्याप एकही कोरोना संशयित रु ग्ण आढळलेला नाही. कळवण व सुरगाणा तालुका आरोग्य अधिकाऱ्यांसह डॉ. सुधीर पाटील, डॉ. रवींद्र सपकाळे यांनी आरोग्य पथके तयार केली आहेत. या पथकांमध्ये आशा स्वयंसेविका, आरोग्यसेवक, सेविकांचा समावेश आहे. कोरोना संशयित रु ग्ण आढळल्यास त्यावर तातडीने उपचार होण्यासाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयात नियमित रु ग्णवाहिकेबरोबरच १०८ रुग्णवाहिका तैनात आहे.

Web Title: Health squads deployed to guard against coronas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.