पांगरी येथे आरोग्य सर्वेक्षण मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:10 AM2021-05-03T04:10:16+5:302021-05-03T04:10:16+5:30
शिक्षक, आरोग्य सेवक, आणि अंगणवाडी सेविका, सीवायडी सेवक यांचा सर्वेक्षण पथकात समावेश करण्यात आला आहे. सर्वेक्षणदरम्यान घरातील प्रत्येक ...
शिक्षक, आरोग्य सेवक, आणि अंगणवाडी सेविका, सीवायडी सेवक यांचा सर्वेक्षण पथकात समावेश करण्यात आला आहे.
सर्वेक्षणदरम्यान घरातील प्रत्येक व्यक्तीचे तापमान, ऑक्सिजन पातळी, पल्स रेट याच्या नोंदी घेण्यात येत आहे. ऑक्सिजन पातळी खालावलेल्या तसेच अधिक तापमान असलेल्या, कोरोनाची लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांची स्वतंत्र माहिती तयार करून ही माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांना देण्यात येत आहे. त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांचे निदान झाले तर त्यांच्यावर लवकर उपचार करता येणार आहेत. या उपक्रमात आशा सेविका हेमलता बोरसे, सविता निकम, सोनाली चव्हाण, सुनैना चव्हाण, सीवायडी सामाजिक संस्थेचे सोमनाथ पगार तसेच शाळेच्या शिक्षकांचा समावेश आहे.
फोटो ओळी- ०२ पांगरी १
पांगरी येथे माझे कुटुंब, माझी जबाबदारी, या विशेष उपक्रमाअंतर्गत आरोग्य सर्वेक्षण मोहीम राबवितांना कर्मचारी.
===Photopath===
020521\02nsk_29_02052021_13.jpg
===Caption===
पांगरी येथे माझे कुटुंब, माझी जबाबदारी, या विशेष उपक्रमाअंतर्गत आरोग्य सर्वेक्षण मोहीम राबवितांना कर्मचारी.