मालेगाव तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सलाइनवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:14 AM2021-03-05T04:14:47+5:302021-03-05T04:14:47+5:30
तालुक्यात ९ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. आरोग्य केंद्रांवर ३३९ पदांपैकी १२१ पदे रिक्त आहेत. परिणामी, २१८ कर्मचाऱ्यांना कामकाजाचा अतिरिक्त ...
तालुक्यात ९ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. आरोग्य केंद्रांवर ३३९ पदांपैकी १२१ पदे रिक्त आहेत. परिणामी, २१८ कर्मचाऱ्यांना कामकाजाचा अतिरिक्त ताण सहन करावा लागत आहे. तालुक्यात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर आरोग्य यंत्रणेने काबाडकष्ट करून कोरोना आटोक्यात आणला. कोरोना सध्या नियंत्रणात आहे. मात्र, दैनंदिन लसीकरण मोहीम राबविण्यात अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे अडचण निर्माण झाली आहे. ४० टक्के कर्मचारी पदे रिक्त असल्यामुळे आरोग्य सुविधा पुरविण्यास यंत्रणेला धावपळ करावी लागत आहे. आरोग्य विभागच सलाइनवर असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कर्मचाऱ्यांना नियमितपणे कोविड, नॉनकोविड सुविधांसह पोलिओ, डीसीजी, पेटाव्हॅलंट, गोवर, रुबेला, व्हिटॅमिन ए, गरोदर माता लसीकरण, कोरोना चाचणी यासह क्षयरोग, कुष्ठरोग तपासणी, साथीच्या आजारांचे नियंत्रण, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया आदी कामकाज करावे लागत आहे. आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णसंख्येचा विचार करता कर्मचारी सेवा देण्यास अपुरे पडत आहेत. शासनमान्य पदेच रिक्त असल्यामुळे नागरिकांनी आरोग्य सेवेची अपेक्षा कोणाकडून करावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. लोकप्रतिनिधींनीही याकडे दुर्लक्ष केले आहे.
इन्फो...
पद - मंजूर - भरलेली - रिक्त
तालुका आराेग्य अधिकारी - १ - १ - ०
प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी - २० - १३ - ०७
समुदाय आरोग्य अधिकारी - ४० - ३७ - ०३
तालुका आरोग्य पर्यवेक्षक - १ - ० - १
औषध निर्माण अधिकारी - १० - ०८ - ०२
प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी - ९ - ४ - ५
तालुका आरोग्य सहायक - १-१-०
आरोग्य सहायक - १८ - १३ - ०५
आरोग्य साहाय्यिका - ९ - ४ - ५
आरोग्य साहाय्यिका (एनएचएम) - ९ - ४ - ५
आरोग्य सेवक - ५३ - ४० - १३
आरोग्य सेविका - ६१ - ४४ - १७
आरोग्य सेविका (एनएचएम) - ५२-१२-४०
कनिष्ठ सहायक - ९ - ५ - ४
परिचर - ३७ - १३ - १४
वाहन चालक - ९ - ९ - ०
एकूण - ३३९ - २१८ - १२१