आरोग्य विद्यापीठ : तीन महिला कर्मचारी उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 12:28 AM2018-05-05T00:28:42+5:302018-05-05T00:28:42+5:30
नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठातील रोजंदारी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेल्या उपोषणाच्या चौथ्या दिवशी तीन महिला कर्मचाºयांची तब्येत खालावल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठातील रोजंदारी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेल्या उपोषणाच्या चौथ्या दिवशी तीन महिला कर्मचाºयांची तब्येत खालावल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. अन्य चौघा कर्मचाºयांनादेखील वैद्यकीय पथकाने दाखल करण्याचा सल्ला दिला आहे; मात्र त्यांनी उपचारास नकार दिला आहे. दरम्यान, उपोषणकर्त्यांची तब्येत खालावत असतानाही प्रशासनाकडून उपोषणकर्त्यांशी कुणीही चर्चेला आले नसल्याने आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठात गेल्या आठ ते दहा वर्षांपासून रोजंदारीपद्धतीने काम करणाºया सुमारे ३५० कर्मचाºयांनी ‘समान काम आणि समान दाम’ या मागणीसाठी गेल्या पाच महिन्यांपासून आरोग्य विज्ञान विद्यापीठासमोर कामबंद आंदोलन सुरू केले आहे. तर १ मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या चौथ्या दिवशी सुमारे दहा कर्मचाºयांची तब्येत खालवल्याने प्रशासनाने त्यांची वैद्यकीय तपासणी करून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला होता आहे. प्राजक्ता वनीस, तृप्ती जाधव आणि ज्योती पेखळे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अन्य काही कर्मचाºयांनी मात्र उपचारास नकार दिला आहे. यामुळे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. कर्मचाºयांनी पुकारलेल्या आंदोलनाला अनेक संघटनांचा पाठिंबा मिळत असल्याने आगामी काळात मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशारादेखील देण्यात आला आहे.