आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांची दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 03:08 PM2018-06-22T15:08:57+5:302018-06-22T15:08:57+5:30
वरखेडा : तालुक्यातील वरखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राला नुकतीच पंचायत समिती सभापती एकनाथ खराटे आदिंसह सदस्यांनी भेट दिली असता एकूण १२ पैकी, केवळ वैद्यकीय अधिकारी व अन्य दोन कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त एकही कर्मचारी हजर नसल्याचे निदर्शनास आले आहे.
वरखेडा : तालुक्यातील वरखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राला नुकतीच पंचायत समिती सभापती एकनाथ खराटे आदिंसह सदस्यांनी भेट दिली असता एकूण १२ पैकी, केवळ वैद्यकीय अधिकारी व अन्य दोन कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त एकही कर्मचारी हजर नसल्याचे निदर्शनास आले आहे. तालुक्यातील वरखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र नेहमीच वादग्रस्त ठरत असून , व रूग्णांना उपचारांसाठी अन्यत्र जावे लागत असल्याने, प्रत्यक्षपणे काय परिस्थिति आहे. हे पहाण्यासाठी दिंडोरी पंचायत समिती सभापती एकनाथ खराटे, माजी सभापती एकनाथ गायकवाड, सदस्य कैलास पाटील, कामिनी चारोस्कर, संगिता घिसाडे, बेबीताई सोळसे, मालती खराटे आदींनी भेट दिली असता, बारा पैकी फक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीमती राशनकर व अन्य दोन कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त अन्य कर्मचाºयांनी चक्क दांडी मारल्याचे उघड झाले आहे. इतके प्रशस्त आरोग्य केंद्र असतांनाही गरोदर महिला अन्य ठिकाणी उपचार व प्रसुतीसाठी का जातात असा सवाल उपस्थित केला असता, सदर आॅपरेशन स्टेशनला पावसाळ्याच्या तोंडावर गळती लागल्याने रूग्णांची गैरसोय होत असल्याचे सांगण्यात आले. गैरहजर कर्मचारी यांच्यावर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
-------------------
वरखेडा येथे डॉक्टर उपस्थित होते, जे कर्मचारी उपस्थित नव्हते त्यांचे त्या दिवसाचे वेतन कपात केले जाईल व जे कर्मचारी स्थानिक ठिकाणी राहणार नाही, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
- डॉ सुचित कोशिरे, तालुका वैद्यकीय अधिकारी, दिंडोरी