पाथरे येथे आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 05:40 PM2020-06-24T17:40:58+5:302020-06-24T17:42:22+5:30
पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे येथील ७६ वर्षीय वृद्धाची कोरोना तपासणी निगेटिव्ह आल्याने पाथरे कोरोना मुक्त झाल्याने परिसरात समाधान व्यक्त होत आहे. आपल्या शस्त्रक्रियेसाठी कोपरगाव येथील दवाखान्यात दाखल झाल्यानंतर त्यांना कोरोना असल्याचे निस्पंन्न झाले होते.
पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे येथील ७६ वर्षीय वृद्धाची कोरोना तपासणी निगेटिव्ह आल्याने पाथरे कोरोना मुक्त झाल्याने परिसरात समाधान व्यक्त होत आहे. आपल्या शस्त्रक्रियेसाठी कोपरगाव येथील दवाखान्यात दाखल झाल्यानंतर त्यांना कोरोना असल्याचे निस्पंन्न झाले होते. पुढील उपचारासाठी त्यांना सिन्नर येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. आता त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना त्यांच्या घरी सोडण्यात आले आहे. त्यांचे स्वागत येथील उपकेंद्राच्या कर्मचाऱ्यांनी केले. या चौदा दिवसांच्या कालावधीत कोरोना बाधित रुग्णाच्या परिसरातील कुटुंबांचे दररोज तपासणी केली जात होती. यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, आशा कर्मचारी, अंगणवाडी सेविका यांनी दररोज तपासणी केली. या कर्मचाऱ्यांचा सत्कार सिन्नर येथे तालुका आरोग्य अधिकारी मोहन बच्छाव यांच्या हस्ते करण्यात आला होता. पाथरे येथील उपकेंद्रातही येथील समुदाय आरोग्य अधिकारी गायत्री मगर, आरोग्य सेविका कमल मुंतोडे यांनी चौदा दिवस काळजीपूर्वक तपासणी करून सेवा देणाऱ्या आशा कर्मचारी, अंगणवाडी सेविका यांचा सत्कार करून मनोबल वाढवले. कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. ग्रामस्थांनी यावेळी आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे. गाव निगेटिव्ह असल्याने बिनधास्त बिगर मास्कचे गर्दीत फिरणे टाळावे असाही सल्ला यावेळी देण्यात आला.
यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी गायत्री मगर, आरोग्य सेविका कमल मुंतोडे, मंदा पाचोरे,अनिता गुंजाळ, मीनाताई पगारे, सुषमा गवळी,उज्वला डोंगरे, जयश्री ढवन, सुनंदा बिडवे, सुमन नरोडे, रागिनी नरोडे, बेबी चीने, जयश्री पडवळ, गायत्री नाईकवाडे, आशा सोमवंशी, सपना सोमवंशी, प्रभावती शेरे आदी कर्मचारी उपस्थित होते.