आरोग्य कर्मचाऱ्यांना मुख्यालय न सोडण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2020 12:17 AM2020-03-10T00:17:33+5:302020-03-10T00:19:11+5:30
नाशिक : जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने कोरोना व्हायरसबाबत शाळा व अंगणवाड्यांना विशेष दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्याबरोबरच आरोग्य व महिला व बाल कल्याण खात्याच्या अधिनस्त कर्मचारी, अधिकाऱ्यांना मुख्यालय न सोडण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी याबाबत परिपत्रक निर्गमित केले असून, यामध्ये कोरोना व्हायरसची लागण लहान मुलांना लवकर होत असल्याने कोरोना व्हायरसबाबत प्रबोधन करतानाच शाळा व अंगणवाडी भरतेवेळी व सुटताना विद्यार्थ्यांचे हात साबणाने स्वच्छ धुण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.
यासाठी सर्व शाळा व अंगणवाड्यांना आवश्यक व्यवस्था करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभा व बचत गटांच्या बैठका सुरू होतेवेळी व संपल्यानंतर उपस्थित सभासदांना हात साबणाने स्वच्छ धुण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सदरचे परिपत्रक तालुका व जिल्हा स्तरावरील सर्व खातेप्रमुखांना देण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिलेल्या निर्देशान्वये जिल्ह्णातील सर्व प्राथमिक शाळा व अंगणवाड्यांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती करण्यात येत असून, ८ मार्चपासून सुरू झालेल्या पोषण पंधरवड्यातदेखील याबाबत माहिती देण्यात येत आहे.जनजागृतीचे आवाहनप्रत्येक गावातील ग्रामस्थ व लहान मुले, विद्यार्थी यांना हात धुण्याचे महत्त्व पटवून देत, याबाबत जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग व महिला बालकल्याण विभागाने आपले अधिनस्त कर्मचारी व अधिकाºयांनी मुख्यालय न सोडता कार्यक्षेत्रातच राहतील याबाबत दक्षता घेण्याचेही आदेश या परिपत्रकात देण्यात आले आहेत.