शहरात कचयाचे ढीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 01:07 AM2018-02-27T01:07:47+5:302018-02-27T01:07:47+5:30

महापालिकेच्या आरोग्य विभागाने सहाही विभागांत साफसफाईसाठी कामगारांचे समसमान वाटप करण्याच्या दृष्टीने नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम आणि नाशिकरोड परिसरातील ४७८ कामगारांच्या बदल्या केल्या. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून या बदल्यांमुळे नियोजन विस्कळीत होऊन प्रामुख्याने, जुने नाशिकसह पश्चिम, नाशिकरोड भागात ठिकठिकाणी कचºयाचे ढीग साचले आहेत.

The heap of cache in the city | शहरात कचयाचे ढीग

शहरात कचयाचे ढीग

Next

नाशिक : महापालिकेच्या आरोग्य विभागाने सहाही विभागांत साफसफाईसाठी कामगारांचे समसमान वाटप करण्याच्या दृष्टीने नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम आणि नाशिकरोड परिसरातील ४७८ कामगारांच्या बदल्या केल्या. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून या बदल्यांमुळे नियोजन विस्कळीत होऊन प्रामुख्याने, जुने नाशिकसह पश्चिम, नाशिकरोड भागात ठिकठिकाणी कचºयाचे ढीग साचले आहेत. दरम्यान, येत्या बुधवार (दि.२८) पर्यंत साफसफाईचे नियोजन सुरळीत होण्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. शहरातील सहाही विभागांत सफाई कामगारांची संख्या समसमान असावी, यासाठी नगरसेवकांकडून सातत्याने मागणी होत होती. त्यानुसार, अभिषेक कृष्ण यांच्या आयुक्तपदाच्या काळातच आरोग्य विभागाकडून समसमान कर्मचारी नियुक्त करण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु, त्याची अंमलबजावणी केली जात नव्हती. दरम्यान, तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी आवश्यकतेपेक्षा जास्त कार्यरत असलेल्या सफाई कामगारांच्या बदल्या करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले होते. त्यानुसार, आरोग्य विभागाने नाशिक पूर्व, पश्चिम आणि नाशिकरोड विभागातील अतिरिक्त कर्मचारी काढून ते सिडको, सातपूर आणि पंचवटी विभागाला दिले. या बदल्यांना सफाई कामगारांच्या संघटनांनी विरोध दर्शविला. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून प्रामुख्याने, जुने नाशिक व पश्चिम विभागातील काही भागांत रस्ते साफ न झाल्याने ठिकठिकाणी कचरा साचलेला आहे. कर्मचारी संख्या कमी झाल्याने आणि नवीन कर्मचाºयांचे अद्याप नियोजन न झाल्याने सदर रस्तेच स्वच्छ होत नसल्याची तक्रार स्थानिक नगरसेवकांसह नागरिक करताना दिसून येत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाचा भोंगळ कारभारही त्यानिमित्ताने समोर आला आहे. काही सफाई कामगारांनी वैद्यकीय कारणास्तव रजेचे अर्ज दिल्यानेही कर्मचारी संख्या रोडावली आहे. पर्यायी व्यवस्था करण्यात न आल्याने कचºयाचे ढीग दिसून येत आहेत.
गैरहजर कर्मचायांना नोटिसा
सफाई कामगारांच्या बदल्यांचे आदेश काढल्यानंतरही काही कामगार कामावर हजर झालेले नाहीत. त्यामुळे आरोग्य विभागाने सुमारे ५० गैरहजर कर्मचाºयांना नोटिसा बजावल्या असून, त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.
आरोग्य सभापतींनी विचारला जाब
शहरात ठिकठिकाणी दोन दिवसांपासून कचरा साचल्याने आरोग्य सभापती सतीश कुलकर्णी यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाºयांना जाब विचारला. यावेळी, कर्मचाºयांच्या बदल्या झाल्यानंतर त्यांचे नियोजन अद्याप सुरू असून, दोन दिवसांत परिस्थिती सुरळीत होईल, असे उत्तर आरोग्य विभागाच्या अधिकाºयांकडून देण्यात आले.

Web Title: The heap of cache in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.