करवाढीच्या विरोधातील सुनावणी टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 01:22 AM2019-03-16T01:22:35+5:302019-03-16T01:23:43+5:30

नाशिक महापालिकेने केलेल्या दरवाढीच्या विरोधात उच्च न्यायालयात दाखल तीन याचिकांवर शुक्रवारी (दि. १५) होणारी सुनावणी टळली.

The hearing against the tax hike was avoided | करवाढीच्या विरोधातील सुनावणी टळली

करवाढीच्या विरोधातील सुनावणी टळली

Next

नाशिक : महापालिकेने केलेल्या दरवाढीच्या विरोधात उच्च न्यायालयात दाखल तीन याचिकांवर शुक्रवारी
(दि. १५) होणारी सुनावणी टळली.
गेल्या ११ महिन्यांपासून करवाढीचा घोळ कायम असून, न्यायालयाकडून अद्यापही दिलासा मिळू शकलेला नाही. वार्षिक करमूल्याच्या आधारे महापालिका आयुक्तांनी केलेल्या दरवाढीमुळे नव्या मिळकतींची घरपट्टी वाढणार आहे तर मोकळ्या भूखंडाचा फटका सामान्य नागरिक तसेच शेतकऱ्यांसह सर्वांनाच बसणार असल्याने याबाबत उच्च न्यायालयात तीन याचिका दाखल झाल्या होत्या. शुक्रवारी (दि. १५) त्यावर सुनावणी होणार होती. परंतु सुनावणी टळली असल्याचे याचिकाकर्ता गुरुमित बग्गा यांनी सांगितले.

Web Title: The hearing against the tax hike was avoided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.