बाजार समिती बरखास्तीची सुनावणी ११ आॅगस्टला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 01:21 AM2017-08-04T01:21:37+5:302017-08-04T01:21:50+5:30
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांवर आर्थिक अनियमितता प्रकरणी गुरुवारी (दि. ३) सुनावणी होऊन उपनिबंधक नीळकंठ करे यांनी सुनावणी ११ आॅगस्टला दुपारी २ वाजता घेण्याचे जाहीर केले.
नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांवर आर्थिक अनियमितता प्रकरणी गुरुवारी (दि. ३) सुनावणी होऊन उपनिबंधक नीळकंठ करे यांनी सुनावणी ११ आॅगस्टला दुपारी २ वाजता घेण्याचे जाहीर केले.
कर्मचाºयांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम घेऊन जाणाºया तीन कर्मचाºयांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले होते. संचालकांना आर्थिक अनियमिता केल्याप्रकरणी बरखास्तीच्या नोटिसा जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांनी बजावल्या आहेत. यापूर्वी ही सुनावणी १० जुलैला व नंतर २९ जुलैला घेण्यात आली होती. गुरुवारी (दि. ३) याप्रकरणी तिसºयांदा सुनावणी झाली. पुढील सुनावणी ११ आॅगस्टला ठेवण्यात आली आहे. संचालकांना आवश्यक ती कागदपत्रे उपलब्ध ठेवण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी दिले आहेत. सुनावणीसाठी बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे, उपसभापती संजय तुंगार, संचालक शंकरराव धनवटे, दिलीप थेटे, संपतराव सकाळे, तुकाराम पेखळे, विश्वास नागरे, संदीप पाटील, श्याम गावित, रवि भोये यांच्यासह सोळा संचालक उपस्थित होते.