नाशिककरांच्या याचिकेवर आज सुनावणी शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 01:58 AM2018-10-25T01:58:59+5:302018-10-25T01:59:26+5:30
मराठवाड्याला पाणी सोडण्यास विरोध करण्यासाठी उच्च न्यायालयात विविध दोन याचिकांवर तातडीने बुधवारीच (दि. २४) सुनावणी करण्यास न्यायमूर्तींनी दिवाळीनंतर सुनावणी घेण्याचे सकाळी सांगितले तथापि, तातडीची बाब दुपारी पुन्हा निदर्शनास आणून दिल्यानंतर न्यायमूर्तींनी गुरुवारी (दि. २५) बघू असे सांगितल्याने आता गुरुवारी सकाळीच सुनावणी होण्याची शक्यता आहे.
नाशिक : मराठवाड्याला पाणी सोडण्यास विरोध करण्यासाठी उच्च न्यायालयात विविध दोन याचिकांवर तातडीने बुधवारीच (दि. २४) सुनावणी करण्यास न्यायमूर्तींनी दिवाळीनंतर सुनावणी घेण्याचे सकाळी सांगितले तथापि, तातडीची बाब दुपारी पुन्हा निदर्शनास आणून दिल्यानंतर न्यायमूर्तींनी गुरुवारी (दि. २५) बघू असे सांगितल्याने आता गुरुवारी सकाळीच सुनावणी होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील जायकवाडी धरणात ६५ टक्के उपयुक्त जलसाठा करण्यासाठी जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने नााशिक आणि अहमदनगर जिल्ह्णातील धरणातून पाणी सोडण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्णातील गंगापूर, दारणा आणि पालखेड या तीन धरण समूहातून सुमारे साडेतीन टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यास नाशिक जिल्ह्णातून विरोध होत आहे. विशेषत: यंदा परतीच्या पावसाने दगा दिल्याने नाशिक जिल्ह्णातील आठ तालुक्यांत गंभीर परिस्थिती आहे. शिवाय धरणात आजमितीला ७७ टक्के इतका सरासरी साठा आहे. अशावेळी मराठवाड्याला पाणी सोडणे म्हणजे नाशिककरांवर अन्याय करण्यासारखे असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील भाजपाचे कार्यकर्ते गोपाळ पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यात गोदावरी नदीच्या ऊर्ध्व भागातील पाणी साठ्याचा विचार करून अन्याय होऊ देऊ नये तसेच २०१६ मध्ये उच्च न्यायालयानेच धरणांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश सहा महिन्यांत करण्याचे आदेश शासनाला दिले होते; मात्र त्याची अंमलबजावणी झाली नसून ती करावी यासह अन्य मागण्यांसाठी ही याचिका होती तर गंगापूर धरणातून बाधित होत असल्याने निफाड येथील शेतकरी अशोक दगू निफाडे यांनीदेखील याचिका दाखल केली आहे.
या दोन्ही याचिकांवर तातडीची सुनावणी व्हावी यासाठी न्या. गवई आणि कर्णिक यांना विनंती करण्यात आली होती; मात्र सकाळी त्यांनी यावर आता सुनावणी होणार नाही तर दिवाळीनंतर सुनावणी होईल असे सांगितले. दरम्यान, दुपारी पुन्हा एकदा अॅड. साखरे आणि अॅड. प्रवर्तक पाठक यांनी याचिकेवरील सुनावणी तातडीची आहे, असे निदर्शनास आणून दिले असता न्यायमूर्तींनी गुरुवारी (दि. २५) सकाळी ठरवू असे सांगितले. त्यामुळे आता गुरुवारी यासंदर्भात सुनावणी होण्याच्या दृष्टीने आशा पल्लवित झाल्या आहेत.