धार्मिक स्थळांच्या याचिकेवर आज सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 02:00 AM2018-11-01T02:00:22+5:302018-11-01T02:01:15+5:30

शहरातील २००९ नंतरच्या ७२ धार्मिक स्थळे हटविण्याच्या विरोधात दाखल याचिकांवर गुरुवारी (दि. १) सुनावणी होणार असून, त्यात काय आदेश मिळतात याकडे शहराचे लक्ष लागून आहे.

 Hearing on religious places petition today | धार्मिक स्थळांच्या याचिकेवर आज सुनावणी

धार्मिक स्थळांच्या याचिकेवर आज सुनावणी

Next

नाशिक : शहरातील २००९ नंतरच्या ७२ धार्मिक स्थळे हटविण्याच्या विरोधात दाखल याचिकांवर गुरुवारी (दि. १) सुनावणी होणार असून, त्यात काय आदेश मिळतात याकडे शहराचे लक्ष लागून आहे.  उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना राज्यातील महापालिका क्षेत्रातील बेकायदेशीर धार्मिक स्थळे हटविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार काही प्रमाणात महापालिकेने बांधकामे हटविली असून, आता २००९ पूर्वीच्या ५०३ आणि नंतरच्या ७२ धार्मिक स्थळांना हटविण्याची कार्यवाही महापालिका करणार आहे. तथापि, २००९ नंतर असलेली बांधकामे ही महापालिकेनेच केलेली असून, खुल्या जागेत असलेली ही धार्मिक स्थळे वाहतुकीला किंवा अन्य कोणालही अडथळा आणणारी नाहीत. त्यामुळे त्यावर कारवाई करू नये अशी धार्मिक स्थळ संस्थांच्या प्रतिनिधींची मागणी आहे.नियमानुसार कार्यवाही न झाल्याचे याचिकाकर्त्या संस्थांनी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याने सध्या न्यायलयाची धार्मिक स्थळे हटविण्यास मनाई आहे.

Web Title:  Hearing on religious places petition today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.