साधुग्राम प्रकरणी आजही सुनावणी
By admin | Published: December 12, 2014 01:24 AM2014-12-12T01:24:01+5:302014-12-12T01:26:29+5:30
साधुग्राम प्रकरणी आजही सुनावणी
नाशिक- साधुग्रामसाठी जागा ताब्यात घेण्याच्या संदर्भात उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सुनावणी सुरूच असून, शुक्रवारीदेखील दोन्ही बाजू ऐकून घेतल्या जाणार आहेत. पुढील वर्षी नाशिकमध्ये भरणाऱ्या कुंभमेळ्यासाठी ३२३ एकर क्षेत्राची गरज आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने तात्पुरते अधिग्रहण करण्यास प्रारंभ केला आहे. त्याला विरोध करीत २८ शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. अधिग्रहण नको थेट भूसंपादन करा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे; परंतु कुंभमेळा तोंडावर आल्याने भूसंपादनास पुरेसा वेळ नसल्याने तात्पुरते अधिग्रहण करीत असल्याचे जिल्हा प्रशासनानेच म्हणणे आहे. न्यायालयात यासंदर्भात सुनावणी झाली, उद्याही सुनावणीचे कामकाज सुरूच राहणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.