‘महावितरण’च्या करवाढ प्रस्तावावर आज सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 01:17 AM2020-02-15T01:17:10+5:302020-02-15T01:19:37+5:30
महावितरणने ६ हजार ३१३ कोटी रुपयांची वीज दरवाढ सुचवली असून तब्बल २०.४ टक्के इतकी प्रचंड दरवाढ सुचविणारा प्रस्ताव नियामक आयोगाकडे सादर केला असून, त्यावर विभागीय पातळीवर सुनावणी सुरू झाली आहे. शनिवारी (दि.१५) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात यावर सुनावणी होणार असून त्यावर अनेक हरकती घेणार आहेत.
नाशिक : महावितरणने ६ हजार ३१३ कोटी रुपयांची वीज दरवाढ सुचवली असून तब्बल २०.४ टक्के इतकी प्रचंड दरवाढ सुचविणारा प्रस्ताव नियामक आयोगाकडे सादर केला असून, त्यावर विभागीय पातळीवर सुनावणी सुरू झाली आहे. शनिवारी (दि.१५) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात यावर सुनावणी होणार असून त्यावर अनेक हरकती घेणार आहेत.
महावितरणच्या वतीने दरवर्षी अशाप्रकारचे करवाढीचे प्रस्ताव नियामक आयोगाकडे सादर केला जातो त्यावर हरकती आणि सुनावणींची प्रक्रिया विभागीय पातळीवर होत असते. यंदा महावितरणने २० वर्षांच्या इतिहासातील सर्वाधिक म्हणजे ५ वर्षात ६ हजार ३१३ कोटी रुपयंची अतिरिक्त वसुली मागविणारा
एकूण २०. ४ टक्के दरवाढ लादणारा प्रस्ताव सादर केला आहे. इतक्या महाग दराने वीज देण्याबरोबरच अनेक बाबी कळीच्या ठरल्या आहेत त्यामुळे सुनावणी गाजण्याची शक्यता आहे. सकाळी १० वाजता नियोजन भवनात याबाबत सुनावणी होणार आाहे. या सुनावणीत उद्योजकांना न परवडणारे दर, अन्य राज्य आणि महाराष्टÑातील दर यातील तफावत आहे.
मार्ग बंद असल्याने अडचणीची शक्यता
नियोजन भवनात ही सुनावणी होत असताना राज्य वकील परिषदेमुळे पोलिसांनी सीबीएस ते मेहेर दरम्यान वाहनांना बंदी घातली आहे. त्यामुळे सुनावणीसाठी येताना ग्राहकांना अडचण येण्याची शक्यता आहे. अर्थात, सुनावणी सकाळपासून सुरू होणार असून, वकील परिषदेला सायंकाळी प्रारंभ होणार असल्याने ग्राहकांना फार अडचण येण्याची शक्यता नसल्याचे महावितरणच्या सूत्रांनी सांगितले.