पेठ तालुक्यात राष्ट्रीय कृमिमुक्त दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 11:41 PM2018-02-10T23:41:59+5:302018-02-11T00:43:49+5:30
पेठ : पेठ तालुक्यात उपकेंद्र कार्यक्षेत्रांतर्गत ६ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्याचे वाटप करून राष्ट्रीय कृमीमुक्त दिन साजरा करण्यात आला.
पेठ : पंचायत समिती आरोग्य विभाग पेठ व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने पेठ तालुक्यात उपकेंद्र कार्यक्षेत्रांतर्गत ६ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्याचे वाटप करून राष्ट्रीय कृमीमुक्त दिन साजरा करण्यात आला. वाघ्याची बारी जिल्हा परिषद शाळा येथे राष्ट्रीय कृमीमुक्तदिनी मुलामुलींना मोफत जंतनाशक औषध वाटप करण्यात आले. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोतीलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जंताच्या प्रादुर्भावाचे चक्र, जंताचा बालकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम, जंताचा प्रादुर्भाव थोपवण्याचे मार्ग आणि जंताचा नाश केल्याने बालकांना होणारे फायदे आदीविषयी आरोग्यसेवक किसन ठाकरे यांनी मार्गदर्शन
केले. शाळा, अंगणवाडी, किशोरवयीन मुली, शाळाबाह्य वयोगट एक ते एकोणावीस वर्षांखालील मुलां-मुलींना उपकेंद्र कार्यक्षेत्रात मोफत जंतनाशक गोळ्या - औषधे वाटप करण्यात आली. आजारी व गैरहजर असणाºया विद्यार्थ्यांना गुरुवारी (दि. १५) मोफत जंतनाशक औषधे देण्यात येतील. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बाळू अहिरे, आरोग्यसेविका रख्मा मोरे, अंगणवाडी कार्यकर्ती रेखा भोये, राधा माळगावे व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.