हृदयाला सुरक्षा देणारे उपकरण सप्तशृंग ट्रस्टला भेट

By admin | Published: September 30, 2016 01:05 AM2016-09-30T01:05:11+5:302016-09-30T01:05:45+5:30

लायन्स क्लब : नाशिक, पंचवटी व पुणे आकुर्डी सफायरचा उपक्रम

The heart-rendering equipment visited the Saptashringa Trust | हृदयाला सुरक्षा देणारे उपकरण सप्तशृंग ट्रस्टला भेट

हृदयाला सुरक्षा देणारे उपकरण सप्तशृंग ट्रस्टला भेट

Next

सप्तशृंगगड : भारतात प्रथमच श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या धर्मार्थ रुग्णालयास हृदयाचे डीफिब्रीलेटर या यंत्र लायन्स क्लब, नाशिक, पंचवटी व पुणे आकुर्डी सफायरतर्फे बसविण्यात आले असून, यामुळे हृदयविकाराचा त्रास जाणवणाऱ्यास संरक्षण मिळणार आहे, अशी माहिती लायन्स क्लब नाशिकचे प्रकल्प मुख्य वैद्य विक्रांत जाधव यांनी दिली.
लायन राजकुमार राऊत यांनी या उपक्रमाची जबाबदारी घेतली आणि आज भारतात प्रथमच हृदयाचे डीफिब्रीलेटर सुरक्षित ठेवणारे, झटका आल्यास तत्काळ मदत देणारे यंत्र ट्रस्टच्या धर्मार्थ रुग्णालयात बसविण्यात आले. आणखी या प्रकारचे एक यंत्र व अत्याधुनिक इसीजी उपकरण गडावर लवकर बसविण्यात येईल. ज्यामुळे श्री भगवती मंदिरात व न्यासाच्या धर्मार्थ रुग्णालयात बसविण्यात येणार असल्याचे हृदयाचा डीफिब्रीलेटर या यंत्राच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी सांगण्यात आले. उपक्रमाचे प्रशिक्षण ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे.
या वेळी पुण्याहून माजी प्रांतपाल हसमुख मेहता, नाशिकचे प्रकल्प मुख्य वैद्य विक्र ांत जाधव, अध्यक्ष नीलिमा जाधव, नवनाथ म्हेत्रे, सचिव प्रवीण जयक्रीश्निया, अरु ण अमृतकर, राजेश कोठावदे, उपविभागीय अध्यक्ष विनोद कोठावदे, प्रकल्प संयोजक
विनय सातपुते, राजकुमार राऊत, योगेश कदम, श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त व प्रकल्प संयोजक उन्मेष गायधनी, सुदर्शन दहातोंडे, भगवान नेरकर, भिकन वाबळे आदि उपस्थितीत होते. (वार्ताहर)

Web Title: The heart-rendering equipment visited the Saptashringa Trust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.