सैन्यदलातील जवानाचा हृदयविकाराने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 06:51 PM2018-12-29T18:51:12+5:302018-12-29T19:01:25+5:30

राजापूर : तालुक्यातील सोमठाण जोश येथील भारतीय सैन्य दलातील मेजर नवनाथ कारभारी आगवन (४३) यांचे पुणे येथे कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. शनिवारी (दि.२९) सोमठाण जोश येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सैन्य दलाच्या जवानांनी हवेत तीन फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली.

The heart of the rival cardiac death | सैन्यदलातील जवानाचा हृदयविकाराने मृत्यू

जवान नवनाथ आगवन यांची गावातून काढण्यात आलेली अंत्ययात्रा.

googlenewsNext
ठळक मुद्दे सैन्य दलाच्या जवानांनी त्यांच्या सन्मानार्थ बंदुकीतून हवेत तीन फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली.शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राजापूर : तालुक्यातील सोमठाण जोश येथील भारतीय सैन्य दलातील मेजर नवनाथ कारभारी आगवन (४३) यांचे पुणे येथे कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. शनिवारी (दि.२९) सोमठाण जोश येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सैन्य दलाच्या जवानांनी हवेत तीन फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली.
नवनाथ आगवन पुणे येथील सैन्य दलात मेजर म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, चार भाऊ, चार बहिणी असा परिवार आहे. शुक्र वारी (दि.२८) कर्तव्यावर असताना आगवन यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. निधनाची बातमी कळताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली. त्यांचे पार्थिव शनिवारी येवला तालुक्यातील सोमठाण जोश येथे पोहोचल्यावर पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यानंतर त्यांच्याच शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सैन्य दलाच्या जवानांनी त्यांच्या सन्मानार्थ बंदुकीतून हवेत तीन फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली. यावेळी शिवसेनेचे संभाजीे पवार, दिनेश आव्हाड, प्रविण गायकवाड, प्रमोद बोडखे, लक्ष्मण घूगे, समाधान चव्हाण, शंकरराव अलगट, बाळासाहेब दाणे, रामभाऊ केदार आदींनी नवनाथ आगवन यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. नवनाथ आगवण हे जेष्ठ नेते कारभारी आगवण यांचे चिरंजीव तर राजापूर विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन भाऊसाहेब आगवण यांचे ते बंधू होत.

Web Title: The heart of the rival cardiac death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू