पाठक यांच्या स्मृतिदिनी भावपूर्ण आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:14 AM2021-03-22T04:14:09+5:302021-03-22T04:14:09+5:30
नाशिक - किशोर पाठक यांनी जीवन भर शब्दांशी मैत्र केले आणि नाशिक सह महाराष्ट्रात प्रतिभावंत कवी म्हणून कीर्ती मिळवली. ...
नाशिक - किशोर पाठक यांनी जीवन भर शब्दांशी मैत्र केले आणि नाशिक सह महाराष्ट्रात प्रतिभावंत कवी म्हणून कीर्ती मिळवली. कोणताही कवी शरीराने आपल्यात नसला तरी त्याच्या कवितेच्या रूपाने तो कायमचा आपल्यात असतो. किशोर पाठक हे त्यांच्या अक्षर वांङमयाचा रुपाने आपल्यात सदैव राहतील , असे विचार कवी व ग्रामीण लेखक विजयकुमार मिठे यांनी किशोर पाठक यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.
सार्वजनिक वाचनालयाच्या सांस्कृतिक विभागाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमास राजेंद्र उगले प्रशांत कापसे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी किशोर पाठक यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. अँड. अभिजित बगदे यांनी सार्वजनिक वाचनालयाच्या विविध कार्यक्रमातील किशोर पाठक, आनंद जोर्वेकर यांच्या आठवणी जागविल्या. सार्वजनिक वाचनालयाचा साहित्यिक मेळावा आणि किशोर पाठक हे अगदी एकरूप झालेले होते असेही बगदेंनी सांगितले. पाठक यांच्या मनात अनेक साहित्यविषयक उपक्रम होते, त्यांच्या हयातीत ते प्रत्यक्षात येऊ शकले नाही. त्यांना आदरांजली म्हणून पुढील काळात असे उपक्रम वाचनालयाने राबवावे असे प्रशांत कापसे, राजेंद्र उगले यांनी नमूद केले. पाठक यांनी सार्वजनिक वाचनालयाच्या अक्षरबाग साहित्य संमेलनात त्यांनी सहभाग घेतला होता. त्यांना अनेक मानसन्मान मिळायला हवे होते पण तत्पूर्वी नियतीने त्यांना आपल्यातून नेले, अशी खंत बालविभाग प्रमुख संजय करंजकर यांनी व्यक्त केली. सार्वजनिक वाचनालय आणि किशोर पाठक यांचं नातं दृढ होतं. दीर्घकाळ वाचनालयात विविध साहित्यविषयक उपक्रम त्यांनी राबविले होते. अशी आठवण कार्याध्यक्ष वसंत खैरनार यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक वाचनालयाचे प्रमुख कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर यांनी केले . सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख गिरीश नातू यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. शंकर बोऱ्हाडे यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते किशोर पाठकांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तसेच ज्येष्ठ लेखक चंद्रकांत महामिने यांच्या पत्नी शीला महामिने यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
फोटो
२१ पाठक आदरांजली