शहरात जाणवू लागला उन्हाचा तीव्र चटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 11:51 PM2020-04-06T23:51:48+5:302020-04-06T23:52:15+5:30
नाशिक : शहरात उन्हाळा जाणवू लागला असून, तापमान आता ३८ अंशांपर्यंत जाऊन पोहोचले आहे. गेल्या काही वर्षांत नाशिक शहरात पावसाळा आणि हिवाळ्याइतकाच उन्हाळादेखील कडक असतो.
नाशिक : शहरात उन्हाळा जाणवू लागला असून, तापमान आता ३८ अंशांपर्यंत जाऊन पोहोचले आहे. गेल्या काही वर्षांत नाशिक शहरात पावसाळा आणि हिवाळ्याइतकाच उन्हाळादेखील कडक असतो. उत्तर महाराष्टÑातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या नाशिकमध्ये आता पारा चाळिशीच्या पार जात असतो. गेल्या आठवडाभरापासून कमाल तापमान ३६ अंशांपर्यंत गेले होते. तर एप्रिल महिन्यापासून शहरातील तापमान वाढण्यास सुरुवात झाली आहे. बुधवारी (दि. १) जिल्ह्याचे तापमान ३६.६ होते. गुरुवारी (दि.२) ३२७.७, शुक्रवारी (दि.३) ३७.७, शनिवारी (दि. ४) ३७.८ इतक्या तापमानाची नोंद झाली. रविवारी (दि.५) ३८.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सोमवारी मात्र पुन्हा ३७ अंश सेल्सिअस नोंद झाली.