शहरात वाढला उन्हाचा चटका; तापमानाचा पारा 39.3 अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:14 AM2021-04-11T04:14:54+5:302021-04-11T04:14:54+5:30

--- नाशिक : शहराच्या कमाल तापमानामध्ये शनिवारी(दि.10) पुन्हा वाढ झाल्याचे दिसून आले. यामुळे उकाड्यात वाढ जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांना ...

The heat of the city increased; Temperature mercury at 39.3 degrees | शहरात वाढला उन्हाचा चटका; तापमानाचा पारा 39.3 अंशावर

शहरात वाढला उन्हाचा चटका; तापमानाचा पारा 39.3 अंशावर

Next

---

नाशिक : शहराच्या कमाल तापमानामध्ये शनिवारी(दि.10) पुन्हा वाढ झाल्याचे दिसून आले. यामुळे उकाड्यात वाढ जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांना उष्म्याचा त्रास सहन करावा लागत आहे. शहरात शनिवारी 39.3 अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदविले गेले. पुढील चार दिवसांत मध्य व उत्तर महाराष्ट्रातसुद्धा अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. शहरात शनिवारी अधूनमधून ढगाळ हवामानही बघावयास मिळाले.

नाशिक शहरामध्ये गेल्या आठवडाभरापासून त्यांना चा तडाखा हा वाढलेला दिसून येत आहे पस्तीशीच्या जवळपास राहणारे कमाल तापमान शनिवारी अचानकपणे 39.3 अंशापर्यंत पोहचल्याने दमट हवामान आणि उष्मा वाढल्याचा अनुभव नाशिककरांना आला. दिवसभर नागरिक घामाघूम झाले होते. पंखे, कुलर, वातानुकूलित यंत्रांच्या वापरावर अधिकाधिक भर देत नागरिकांनी वाढत्या उकाड्यापासून दिलासा मिळविण्याचा प्रयत्न केला.

शनिवारी दुपारी अधूनमधून ढगदेखील दाटून आल्याने वातावरणातील दमटपणा वाढला होता. किमान तापमानसुद्धा 19 अंशपर्यंत जाऊन पोहचल्याने नागरिकांना रात्रीही उष्म्याचा सामना करावा लागत आहे.

वाऱ्याची बदलणारी दिशा आणि तामिळनाडूच्या अंतर्गत किनारपट्टीवरून कमी दाबाचा पट्टा आता दक्षिण-पश्चिम मध्य प्रदेश व लगतच्या भागाकडे सरकत असल्याने वाऱ्याच्या दिशेत बदल होताना दिसत असल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे मागील 48 तासांत मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काही भागांत अवकाळी सरी कोसळल्या. वाऱ्याच्या द्रोणीय भागाच्या प्रभावामुळे येत्या चार ते पाच दिवसांत राज्यात मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळण्याची श्यक्यता हवामान खात्याकडून वर्तविली गेली आहे. विदर्भातील काही जिल्ह्यात गारपीटदेखील होण्याचा धोका वर्तविला गेला आहे. काही शहरांमध्ये वाऱ्याचा ताशी वेग वाढलेला दिसून येईल. यामुळे शेतकऱ्यांनी अधिकाधिक खबरदारी घेण्याची गरज असल्याचे मुंबई हवामान प्रादेशिक विभागाच्या शुभांगी भुते यांनी सांगितले.

Web Title: The heat of the city increased; Temperature mercury at 39.3 degrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.