अभोण्यात उष्माचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 07:26 PM2019-04-14T19:26:24+5:302019-04-14T19:27:01+5:30

अभोणा : शहर परिसरात तापमान वाढले असुन शनिवारी तापमानात उच्चांकी वाढ झाल्याने उष्माचा तडाखा वाढल्याने अभोणेकर घामाघुम झाले आहेत. गेल्या मॅहन्यापासून सातत्याने उष्णता वाढत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Heat shock in Abbey | अभोण्यात उष्माचा तडाखा

अभोण्यात उष्माचा तडाखा

Next
ठळक मुद्देजनजीवन विस्कळीत झाले आहे.

अभोणा : शहर परिसरात तापमान वाढले असुन शनिवारी तापमानात उच्चांकी वाढ झाल्याने उष्माचा तडाखा वाढल्याने अभोणेकर घामाघुम झाले आहेत. गेल्या मॅहन्यापासून सातत्याने उष्णता वाढत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा उन्हाची दाहकता अधिक आहे. दरम्यान शुक्र वार व शनिवारीही शहर परिसरात ढगाळ वातावरण कायम राहिल्याने उष्णतेचा चटका असह्य होऊ लागला आहे. तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार एप्रिल अखेरीस तापमान चाळीसी गाठणार तर मे महिन्यात चाळीसी पार पोहोचण्याची शक्यता वर्तिवण्यात आल्याने चैत्रातच वैशाख वणव्याचे चटके असह्य होत असतांना प्रत्यक्ष वैशाखातील उष्मा कसा असेल या कल्पनेने सर्वसामान्य काळजीत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
दरम्यान तापमान चाळीसी पार जात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी जास्तीत जास्त पाणी पिण्यासह तेलकट, चमचमीत, मसालेदार पदार्थ खाण्याचे टाळावे ऊष्माघाताने अशक्तपणा वाटल्यास वैद्यकिय सल्ला घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

Web Title: Heat shock in Abbey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.