शिक्षिकेला उष्माघाताचा झटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 01:32 AM2019-03-30T01:32:10+5:302019-03-30T01:32:29+5:30
भामेश्वर, ता. बागलाण येथील जिल्हा परिषद शाळेत शुक्रवारी दुपारी शिक्षण परिषद सुरू होण्याआधी रणरणत्या उन्हामुळे एका प्राथमिक शिक्षिकेला उष्मघाताचा झटका आल्याने त्यांना शिक्षकांनी खासगी रुग्णालयात दाखल केले.
औंदाणे : भामेश्वर, ता. बागलाण येथील जिल्हा परिषद शाळेत शुक्रवारी दुपारी शिक्षण परिषद सुरू होण्याआधी रणरणत्या उन्हामुळे एका प्राथमिक शिक्षिकेला उष्मघाताचा झटका आल्याने त्यांना शिक्षकांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. प्रशासनाने ऐन उन्हाळ्यात शाळांची वेळ ११ ते ५ केल्याने शिक्षकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
येथील शाळेत शुक्रवारी (दि. २९) सकाळी ११ ते ५ यावेळेत लखमापूर बिटाची शिक्षण परिषद आयोजित केली होती. सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत शिक्षकांनी शाळा भरविली व ११ ते ५ वाजेदरम्यान भरउन्हात शिक्षण परिषद असल्याने सुराणे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका शोभा देवरे यांना उन्हामुळे उष्मघाताचा त्रास जाणवू लागल्याने शिक्षिका व शिक्षकांनी त्यांना त्वरित रुणालयात दाखल केले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले. शनिवारी शाळांची वेळ कायमस्वरूपी सकाळी ७.१५ ते ११.३० असतानाही शानिवारी ऐन उन्हाळ्यात सकाळी १०.४५ ते ५ केल्याने शिक्षकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.