राजापूर परिसरात उष्णतेची लाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 06:15 PM2019-04-29T18:15:39+5:302019-04-29T18:16:22+5:30
येवला तालुक्यातील राजापूर व पूर्वेकडील भागात तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या वर गेल्याने वाढत्या उन्हामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम जाणवू लागला आहे. सकाळी दहा वाजेपासूनच उन्हाचा चटका बसायला सुरुवात होत असल्याने दुपारी नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहे.
राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर व पूर्वेकडील भागात तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या वर गेल्याने वाढत्या उन्हामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम जाणवू लागला आहे. सकाळी दहा वाजेपासूनच उन्हाचा चटका बसायला सुरुवात होत असल्याने दुपारी नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहे.
ग्रामीण भागात जनावरांना झाडांच्या सावलीत बांधावे लागते आहे. राजापूर व परिसरात उष्णतेची लाट आहे. त्यात लग्नसराई सुरू असल्याने नागरिक उन्हामुळे बऱ्याच लग्नाला जाणे टाळत आहे. जवळचे असेल तर बस, काळीपिवळी, रिक्षाने जाण्याला पसंती देत आहे. रस्त्याच्या कडेला अनेक ठिकाणी रसवंतीची दुकाने थाटली आहेत. यामुळे वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळत आहे. राजापूर व परिसरात पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याने व उन्हाच्या झळा असह्य होत असल्याने गावी जाताना पाणी बाटली व जारच्या पाण्याला नागरिक पसंती देत आहे. वाºयाचा वेगही कमी झाल्याने नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. जनावरांनाही उष्म्याची झळ बसत आहे. जनावरांना दिवसातून तीनवेळा पाणी पाजावे लागत आहे.
या उन्हामुळे दुभत्या गायी दूध कमी देत आहे त्यामुळे दूध उत्पादनावरही परिणाम झाला आहे. तसेच जनावरांना ताप येणे अशा आजाराचा सामना करावा लागतो आहे. दुपारी दीड ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत रस्त्यावर वाहनांची वर्दळ नसते. रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
(२९ राजापूर)