दोन दिवस उष्णतेची लाट ; सतर्कतेच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 12:53 AM2018-04-29T00:53:56+5:302018-04-29T00:53:56+5:30

भारतीय हवामान विभागाने देशभरातील विविध भागांमध्ये उष्णतेच्या लाटेची सुरुवात नेहमीपेक्षा लवकर होण्याचा अंदाज वर्तविल्यानुसार नाशिक शहर व जिल्ह्यातील काही भागांमध्ये पारा ४४ अंशांहून पुढे सरकला असून, येत्या ४८ तासांत नाशिक जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे, अशा सतर्कतेच्या सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिल्या आहेत.

Heat wave for two days; Alert notifications | दोन दिवस उष्णतेची लाट ; सतर्कतेच्या सूचना

दोन दिवस उष्णतेची लाट ; सतर्कतेच्या सूचना

googlenewsNext

नाशिक : भारतीय हवामान विभागाने देशभरातील विविध भागांमध्ये उष्णतेच्या लाटेची सुरुवात नेहमीपेक्षा लवकर होण्याचा अंदाज वर्तविल्यानुसार नाशिक शहर व जिल्ह्यातील काही भागांमध्ये पारा ४४ अंशांहून पुढे सरकला असून, येत्या ४८ तासांत नाशिक जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे, अशा सतर्कतेच्या सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिल्या आहेत.  हवामान खात्याच्या अंदाजानुसार शनिवारी दुपारी बारा वाजेपासून येत्या ४८ तासांत नाशिक, अहमदनगर, जळगाव या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येणार असून, तपमान ४५ सेल्सिअंश अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. आरोग्यासाठी घातक ठरणाऱ्या उष्माघाताच्या घटना टाळण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या राष्टÑीय आपत्ती व्यवस्थापन विभागाने प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकाºयांची नेमणूक केली आहे. हवामान खात्याने यापूर्वीही एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच देशाच्या विविध भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता व्यक्त केली होती व त्यानुसार एप्रिल महिन्यात काही दिवसांचा अपवाद वगळता तपमानाने चाळिशी गाठली होती. आता मे महिन्याच्या उंबरठ्यावर पुन्हा एकदा उष्णतेची लाट आल्याने साधारणत: महिनाभर ती कायम राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्या दृष्टीने काय उपाययोजना करता येतील त्याचे मार्गदर्शक तत्त्वेही राष्टÑीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने ठरवून दिली आहेत. नागरिकांना उष्णतेपासून बचाव करता यावा यासाठी नाशिक जिल्ह्यातील मंदिरे, सार्वजनिक इमारती, हॉल, उद्याने दुपारीसुद्धा उघडी ठेवण्यात यावी जेणे करून दुपारच्या वेळेस लोकांना तेथे आश्रय देता येईल. त्याचबरोबर जिल्ह्यात पुरेशा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, या काळात रुग्णालये, आरोग्य केंद्रे आदी ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित करू नये याची काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

Web Title: Heat wave for two days; Alert notifications

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.