लाल कांद्याची प्रचंड आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 06:26 PM2019-01-04T18:26:01+5:302019-01-04T18:26:20+5:30
उमराणे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याची प्रचंड आवक झाली असुन रास्ता रोको आंदोलनानंतर बाजार भावात काही अंशी सुधारणा झाली आहे. लाल कांद्यास आज सर्वोच्च ९०० रु पये भाव मिळाला आहे.
उमराणे : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याची प्रचंड आवक झाली असुन रास्ता रोको आंदोलनानंतर बाजार भावात काही अंशी सुधारणा झाली आहे. लाल कांद्यास आज सर्वोच्च ९०० रु पये भाव मिळाला आहे. चालु आठवड्यात येथील बाजार समतिीत लाल कांद्याची प्रचंड आवक झाली आहे. आठवड्याच्या सुरूवातीस दोन दिवस लाल कांद्याचे बाजारभाव ९०० रूपयांपर्यंत होते. परंतु बुधवार (दि. २) रोजी सकाळच्या सत्रात लाल कांद्याच्या दरात तब्बल ३०० रूपयांची घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडत रास्ता रोको आंदोलन छेडले होते. त्यानंतर दुपारच्या सत्रात बाजारभावात १०० रूपयांची वाढ होत. ७५० रूपयांपर्यंत पोहचले होते. गुरूवारीही बाजारभाव ८०० रूपयांपर्यंत होते. परंतु आज शुक्रवारी आवक वाढुनही बाजारभावात पुन्हा १०० रूपयांची वाढ होत ९०० रूपयांपर्यंत लाल कांदा विक्री झाला. बाजारआवारात 850 वाहनांतुन सुमारे 16 ते 17 हजार क्विंटल आवक होऊन बाजारभाव कमीत कमी 351 रु पये, जास्तीत जास्त 900 रु पये तर सरासरी 650 रु पयांपर्यंत होते.
उन्हाळी कांद्यांच्या दरात पुन्हा 100 रु पयांची घसरण ; सर्वोच्च दर 281 रु पये - लाल कांद्याची आवक कमी होईल व उन्हाळी कांद्याचे भाव वाढतील या अपेक्षेपोटी तब्बल दहा मिहन्यांपासुन चाळीत साठवून ठेवलेल्या उन्हाळी कांद्याची बिकट अवस्था झाली असुन वातावरणात बदल झाल्याने चाळीतील कांद्यांना कोमटे फुटल्याने बाजारात निम्मीच कांदा विक्र ीसाठी आणला जात असुन त्यालाही कवडीमोल भाव मिळत आहे.कालच्या बाजारात या कांद्याला सर्वोच्च 391 रु पये भाव मिळाला होता.परंतु आज पुन्हा 100 रु पयांची घसरण होत 281 रु पये सर्वोच्च भाव मिळाला . तर कमीतकमी 50 रु पये व सरासरी 120 रु पये असा भाव होता.