मानोरी परिसरात परतीच्या पावसाची दमदार हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 08:55 PM2020-09-30T20:55:30+5:302020-10-01T01:07:06+5:30
मानोरी : गेल्या आठ दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने मानोरी बुद्रुक, खडकीमाळ, मुखेड फाटा परिसरात बुधवारी, (दि. 30) संध्याकाळी साडेपाच वाजता अचानक वादळी वार्?यासह जोरदार हजेरी लावली. यामुळे पिकांची सोंगणी करत असलेल्या शेतकर्?यांची एकच तारांबळ उडाली होती.
मानोरी : गेल्या आठ दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने मानोरी बुद्रुक, खडकीमाळ, मुखेड फाटा परिसरात बुधवारी, (दि. 30) संध्याकाळी साडेपाच वाजता अचानक वादळी वार्?यासह जोरदार हजेरी लावली. यामुळे पिकांची सोंगणी करत असलेल्या शेतकर्?यांची एकच तारांबळ उडाली होती.
पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झालेले असताना सर्वत्र सोयाबीन सोंगणी करण्याच्या कामात शेतकरी व्यस्त होते. दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात उष्ण आणि दमट हवामान निर्माण झाले होते. अशातच सुरू असलेल्या सोयाबीन सोंगणीची लगबग सुरू होती. दरम्यान, बुधवारी (दि.३०) संध्याकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सोंगुण ठेवलेली सोयाबीन, भुईमूग आदी पिके तशीच शेतात असल्याने भिजली. या पावसाने काढून ठेवलेले पिक सडून जाण्याची भीती शेतकºयांमध्ये व्यक्त केली जात असून हातातोंडाशी आलेला घास पुन्हा हिरावला जाणार असल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.
आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, बाजरी आदी पिकांच्या सोंगणीच्या कामात व्यस्त असलेल्या शेतकºयांच्या चिंतेत अचानक आलेल्या अवकाळी पावसाची मोठी भर पडली आहे. कांद्याच्या रोपाचे आणि उळ्याचे आधीच प्रचंड नुकसान झालेले असताना आठ दिवसांपासून पाऊस उघडला असल्याने पुन्हा महागड्या दराने उळे आणि रोपे घेऊन कांदा लागवड सुरू केली होती. मात्र शेतकºयांच्या या मेहनतीवर अवकाळी पावसाने पुन्हा पाणी फेरत रोपांचे आणि बियाणांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात कांद्याच्या उळ्याचा आधीच तुटवडा निर्माण झालेला असताना वारंवार होत असलेल्या मुसळधार पावसामुळे उळे, रोपे वाहून जात असल्याने शेतकºयांचा मोठ्या प्रमाणात खर्च मातीमोल होत असल्याने शेतकºयांच्या चिंतेत अधिक भर पडली आहे.