झगडपाडा परिसरात जोरदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 01:07 AM2019-07-27T01:07:21+5:302019-07-27T01:07:51+5:30
तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या झगडपाडा परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने येथील शिवनदीला पूर येऊन फरशी पुलावरून पाणी वाहू लागले. अशावेळी विद्यार्थी व ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन पुरातून मार्गस्थ व्हावे लागले.
सुरगाणा : तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या झगडपाडा परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने येथील शिवनदीला पूर येऊन फरशी पुलावरून पाणी वाहू लागले. अशावेळी विद्यार्थी व ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन पुरातून मार्गस्थ व्हावे लागले.
आंबूपाडा येथे शासकीय आश्रमशाळा व आयटीआय आहे. तसेच मुख्य बाजारपेठ म्हणून बाºहे येथे या भागातील नागरिक ये-जा करीत असतात. याठिकाणी शासकीय आश्रमशाळा ते झगडपाडा दरम्यान एक अरूंद आणि कमी उंचीचा पूल आहे.
पावसाळ्यात जरी कमी पाऊस पडला तरी येथे पूर येत असतो आणि त्या पुलावरून वेगाने पाणी वाहत असते. त्यामुळे या परिसरातील झगडपाडा, खोकरविहीर, चिंचपाडा, भेनशेत, कहांडोळपाडा या गावातील विद्यार्थ्यांना, नागरिकांना तसेच जि.प. शाळेतील शिक्षकांना या पुलावरून येता जाताना जीव धोक्यात घालून मोठी कसरत करावी लागते आहे. तर जास्त पाऊस पडला तर पूरस्थितीमुळे जि.प. शाळेच्या शिक्षकांना शाळेवर पोहोचता येत नाही, विद्यार्थ्यांना आश्रमशाळेत व आयटीआयला जाता येत नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानदेखील होत आले आहे. तसेच चिंचपाडा (खोकरविहीर) येथील नवीन बांधलेले रु ग्णालय डॉक्टर व कर्मचारीविना धूळ खात असल्याने याच पुलावरून मोठी कसरत करीत जीव धोक्यात घालून बाºहे येथील रु ग्णालयात रु ग्णांना न्यावे लागत आहे.
येथे जास्त उंचीचा पूल बनविण्यात यावा व येथील रु ग्णालयात डॉक्टर व कर्मचारी यांची नियुक्ती करून रु ग्णालय लवकर सुरू करावे अशी मागणी येथील मनोहर जाधव, सुनील महाले, हिरामण महाले, हंसराज घांगळे, हिरामण चौधरी, जयराम घांगळे, मनोहर महाले, देवीदास घांगळे आदी ग्रामस्थांसह विद्यार्थी पुष्पराज घांगळे, मनीषा महाले, दीक्षा जाधव आदी विद्यार्थ्यांनी केली आहे.
पावसाचे प्रमाण जास्त राहिल्यास अशा लहान-मोठ्या पुलावरून अर्ध्या तासाच्या आत पूर येत असतो. त्यामुळे तालुक्यातील अशा छोट्या पुलावरूनदेखील यावर्षी दोन शिक्षकांना तसेच काही ग्रामस्थांना पुरातून मार्ग काढताना वाहून गेल्याने जीव गमवावा लागला आहे.