नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरूच, गंगापूर धरणातून 6 हजार क्यूसेक विसर्ग, गोदावरीला वाढले पाणी
By संजय पाठक | Published: September 16, 2022 10:31 AM2022-09-16T10:31:14+5:302022-09-16T10:31:50+5:30
Heavy Rain in Nashik: नाशिक शहरासह जिल्ह्यातील काही तालुक्यात पाऊस सुरूच असून आज सकाळी गंगापूर धरणातून 6 हजार 741 क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
- संजय पाठक
नाशिक- शहरासह जिल्ह्यातील काही तालुक्यात पाऊस सुरूच असून आज सकाळी गंगापूर धरणातून 6 हजार 741 क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
हवामान खात्याने नाशिकला ऑरेंज अलर्ट दिला असून त्यामुळे दोन दिवसांपासून पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण 95 टक्के भरल्याने पावसाचा अंदाज घेऊन जलसंपदा विभागाने धरणातून विसर्ग सुरू केला आहे. गोदावरी नदीला पाणी वाढू लागल्याने महापालिकेने गोदकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
दरम्यान, आज सकाळपासून वेगवेगळ्या धरणातूनही विसर्ग सुरू असून यात दारणा धरणातून 10 हजार 562, नांदूरमध्यमेश्वरमधून 36 हजार 631 तसेच पालखेड मधून 5 हजार 964 तर कडवा मधून 5 हजार क्यूसेक विसर्ग सुरू आहे.