तासभर जोरदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 11:16 PM2020-06-15T23:16:01+5:302020-06-16T00:18:07+5:30
नाशिक : शहात सोमवारी (दि.१५) सलग तिसऱ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवसभरात ३६.१ मिलीमीटर इतका पाऊस शहरात नोंदविला ...
नाशिक : शहात सोमवारी (दि.१५) सलग तिसऱ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवसभरात ३६.१ मिलीमीटर इतका पाऊस शहरात नोंदविला गेला. दरम्यान, पावसाळी गटारींसह सांडपाणी वाहून नेणाºया गटारी तुडुंब भरून वाहत होत्या. मेनरोड, सराफबाजार, दहीपूल, सारडासर्कल, भद्रकाली, शिवाजीरोड, रविवारकारंजा या मुख्य बाजारपेठांसह कॉलेजरोड, मुंबईनाका, गंगापूररोड, इंदिरानगर या भागातसुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे बाजारपेठ पूर्णत: ठप्प झाली.
मुख्य बाजारपेठेसह इतर व्यावसायिक संकुलात पाणी शिरल्याने व्यावसायिकांसह ग्राहकांची धावपळ उडाली.
पावसाचा जोर सायंकाळी साडेपाचनंतर ओसरल्यावर मोटार लावून पाणी काढण्यात आले. रस्त्यावर आणि काही चौकात पाणी साचल्याने, वाहतुकीचा वेगही मंदावला. सारडा सर्कल परिसरातून वाहने पुढे जाणेही शक्य नव्हते. दरम्यान, मुंबईनाका येथे एक झाड उन्मळून पडले, तर काही भागांत झाडाच्या फांद्या रस्त्यावर पडल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली.
---------------
दुकानात शिरकाव
मेनरोड, सराफबाजार या भागात दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे दुकानदारांचे नुकसान झाले. रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहत असल्याने दुचाकीदेखील वाहून गेल्या. गोदाकाठच्या परिसरासह उपनगरातील गटारी तुडुंब भरून रस्त्यावर वाहत होत्या.
-----------------
४नाशिकरोड ते अंबडपर्यंत विविध उपनगरांमध्ये संध्याकाळी ५ वाजेपासूनच कोसळ‘धार’ सुरू झाली. सायंकाळी साडेचार वाजेपासून जोरदार पावसाला मखमलाबाद, म्हसरूळ, पंचवटी, रविवार कारंजा, सीबीएस, मेनरोड, शालिमार, गंगापूररोड, कॉलेजरोड, चांडक सर्कल, मुंबईनाका, इंदिरानगर, पाथर्डीफाटा या भागात पावसाला सुरुवात झाली. शहर व परिसरात सुमारे दोन तास जोरदार पाऊस सुरू होता.