अभोणा परिसरात तासभर जोरदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 12:28 AM2020-07-27T00:28:06+5:302020-07-27T00:30:19+5:30

दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर शनिवारी (दि.२५) दुपारी ४ वाजेच्या सुमारास मेघगर्जनेसह शहर व परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे तासभर कोसळलेल्या या पावसाने कोमेजून गेलेल्या खरिपाच्या पिकांना दिलासा मिळणार आहे.

Heavy rain for an hour in Abhona area | अभोणा परिसरात तासभर जोरदार पाऊस

अभोणा परिसरात तासभर जोरदार पाऊस

Next
ठळक मुद्देपिकांना जीवदान : बळीराजा आनंदला; चणकापूर धरणात ५२३ दलघफू साठा

अभोणा : दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर शनिवारी (दि.२५) दुपारी ४ वाजेच्या सुमारास मेघगर्जनेसह शहर व परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे तासभर कोसळलेल्या या पावसाने कोमेजून गेलेल्या खरिपाच्या पिकांना दिलासा मिळणार आहे.
जूनच्या प्रारंभीच निसर्ग चक्रीवादळामुळे सलग तीन दिवस पावसाची संततधार सुरू होती. या पावसावर शेतकऱ्यांनी मका, बाजरी, भुईमूग, सोयाबीन आदी पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली, तर पश्चिम आदिवासी पट्ट्यात भात, नागलीची रोपे टाकण्यात आली होती. समाधानकारक पावसाने खरीप पिकांसह रोपेही जोमात होती. मात्र गत पंधरवड्यापासून पावसाने ओढ दिल्याने पिके वाळू लागली होती.भात, नागलीची रोपेही पिवळी पडू लागल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली होती. मात्र शनिवार झालेल्या पावसाने शेतकरी सुखावला आहे. दरम्यान, शनिवारी १८ मिमी पावसाची नोंद झाली, तालुक्यात आत्तापर्यंत २७९ मिमि पाऊस झाला. चणकापूर धरणक्षेत्रात २५ मिमी पाऊस झाला असून, आत्तापर्यंत २७२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आजमितीस धरणात ५२३ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. अभोणा मंडलामध्ये ३५ मिमी पाऊस पडला.
या पावसाने शहरातील सर्वच रस्ते जलमय झाले होते. गावातील सिमेंटच्या रस्त्याला ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. ग्रामपालिका प्रशासनाने तत्काळ खड्डे बुजवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली
आहे.

Web Title: Heavy rain for an hour in Abhona area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.