मांडवड येथे जोरदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 08:13 PM2019-06-27T20:13:24+5:302019-06-27T20:14:30+5:30
मांडवड : लक्ष्मीनगर व परिसरात बुधवारी (दि.२६) झालेल्या पावसामुळे नदी- नाले दुथडी भरुन वाहत आहेत, तर अनेक शेतकऱ्यांच्या शेताचे बांध पाण्याच्या प्रवाहामुळे फउटले. तर काही शेतकऱ्यांच्या विहीरीचे सुध्दा नुकसान झाले. लक्ष्मीनगर धरण ही नदीपात्रापर्यंत भरले आहे. दरम्यान या पहिल्याच पावसाने नागरीकांना दिलासा मिळाला असून शेतीकामांना वेग आला आहे.

गेल्या अनेक वर्षा पासुन लक्ष्मीनगरचे धरण पाण्याविना रिकामेच होते. शिवाय चालु वर्षी तर जनावरे व माणसांसाठी पिण्याचे पाणी हे विकतच घ्यावे लागत होते. या सर्व पाण्याच्या अडचणींमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. मात्र बुधवारी झालेल्या पावसाने सर्व परिसर जलमय करु न टाकल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले मात्र अनेक प्रकारे नुकसान व धावपळ ही उडाली. असे असले तरी सध्या पाण्याची अडचन दूर झाल्याने शेतकरी पुढील शेत कामाला लागले आहेत.