पेठ-सुरगाणा, इगतपुरीत मुसळधार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:12 AM2021-07-20T04:12:23+5:302021-07-20T04:12:23+5:30
दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर पेठ तालुक्यात रविवारी सायंकाळपासून पावसाचे आगमन झाले असून, शेतकरी भाताची लावणी करण्यात गर्क झाले आहेत. भात ...
दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर पेठ तालुक्यात रविवारी सायंकाळपासून पावसाचे आगमन झाले असून, शेतकरी भाताची लावणी करण्यात गर्क झाले आहेत. भात व नागलीची रोपे तयार असल्याने सोमवारपासून खाचरात पाणी साचल्याने लावणीच्या कामास वेग आला आहे. आठवडाभर पाऊस टिकला तर लावणी पूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर सुरगाणा तालुक्यातही जोरदार पाऊस झाल्याने येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळ गेली अनेक वर्षं उभा असलेला वडाचा डेरेदार वृक्ष उन्मळून मुख्य मार्गावर कोसळल्याने दोन ते तीन तास दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली होती. गुजरातकडे भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वाहनांना तसेच पळसन व उंबरठाणकडे जाणाऱ्या वाहनांना मोठा खोळंबा झाला होता. महामार्गावर आडवे पडलेले मोठे वडाचे झाड कापण्यासाठी सुविधा नसल्याने हे झाड बांधकाम विभागाचे अभियंता मिचकुले यांनी जेसीबी उपलब्ध केल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आली. इगतपुरी तालुक्यातही सोमवारी दिवसभर मुसळधार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक मंदावली होती.
फोटो- १९ सुरगाणा ट्री
गुजरातला जोडणाऱ्या सुरगाणा - उंबरठाण राज्य महामार्गावर उन्मळून पडलेले वडाचे झाड.
फोटो- १९ पेठ रेन
पेठ तालुक्यात पावसाचे आगमन झाल्याने नद्यांना आलेला पूर.
190721\19nsk_54_19072021_13.jpg
फोटो- १९ सुरगाणा ट्रीगुजरातला जोडणाऱ्या सुरगाणा - उंबरठाण राज्य महामार्गावर उन्मळून पडलेले वडाचे झाड.