येवला तालुक्यात दमदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 05:39 PM2019-07-21T17:39:48+5:302019-07-21T17:40:01+5:30
मानोरी : येवला तालुक्यात शनिवारी झालेल्या दमदार पावसामुळे शेतकरी वर्ग काहीसा सुखावला असून खरीप हंगामातील मका , सोयाबीन , कपाशी पिकांच्या मशागतीला वेग आल्याचे सर्वत्र दिसून येत आहे.
मानोरी : येवला तालुक्यात शनिवारी झालेल्या दमदार पावसामुळे शेतकरी वर्ग काहीसा सुखावला असून खरीप हंगामातील मका , सोयाबीन , कपाशी पिकांच्या मशागतीला वेग आल्याचे सर्वत्र दिसून येत आहे.येवला तालुक्यात खरीप हंगामात प्रामुख्याने कमी मशागत म्हणून मक्याचे पीक घेत असून विक्र मी उत्पादन आण िजनावरांचा मुख्य चारा म्हणून देखील मक्याचा वापर करत असतात.मात्र यंदा लष्करी अळी मुळे मक्याला पोटच्या पोरावानी सांभाळ करण्याची वेळ शेतकरी वर्गवार आली असून वीस ते बावीस दिवसाच्या मक्याला हजारो रु पये खर्च करण्याची नामुष्की शेतकरी वर्गावर ओढावली असून उत्पादन आण िजनावरांना चारा देखील मिळतो का नाही याची शाश्वती शेतकर्यांना राहिलेली नाही.मृग नक्षत्रापूर्वी मान्सून पूर्व पावसाने शेती मशागतीच्या कामांना यंदा वेळेत सुरु वात झाली होती.जून मिहना समाप्ती नंतर मानोरी , देशमाने , मुखेड फाटा , जळगाव नेउर , पिंपळगाव लेप परिसरात मुसळधार पाउस झाला होता आण ियाच पावसाच्या भरवश्यावर केलेली मका , सोयाबीन ची लागवड शेतकर्याना फायदेशीर ठरली आहे.
यंदा पाउस वेळेत पडत असून उन्हामुळे पाच ते सहा दिवसापूर्वी मका , सोयाबीन पिकाची कोवळे शेंडे सुकण्यास सुरु वात झाली असल्याने शेतकरी काहीसा हिरावला होता.परंतु शनिवारी झालेल्या दमदार पावसामुळे खरीप हंगामातील आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.या पावसामुळे मका , सोयाबीन , कपाशी पुन्हा हिरवीगार आणि टवटवीत झाल्याआहेत.रविवार पासून मक्याला युरिया , खादि टाकण्यास सुरु वात केली आहे.अनेक ठिकाणी लष्करी अळी ने ग्रासलेल्या मका पिकांना खादी मारावी की नाही अशा दुहेरी कात्रीत शेतकरी अडकला आहे.काही ठिकाणी पाउस कमी असल्याने मका , सोयाबीन ची लागवड उशिरा करण्यात आलेली आहे.