जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 10:42 PM2020-06-12T22:42:36+5:302020-06-13T00:09:02+5:30
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे व दोडी परिसरात शुक्रवारी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. मृग नक्षत्र सुरू होऊन सहा दिवस झाले आहेत. परिसरातील काही गावांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे व दोडी परिसरात शुक्रवारी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. मृग नक्षत्र सुरू होऊन सहा दिवस झाले आहेत. परिसरातील काही गावांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. दुपारच्या सुमारास अचानक पाऊस आल्याने भाजीपाला विक्रीसाठी आलेले व्यापारी, शेतकरी व ग्राहक यांची चांगलीच धावपळ उडाली होती. सुमारे अर्धा ते पाऊण तास झालेल्या पावसाने डोंगराच्या काही भागात व शेतात पावसाचे
पाणी साचले होते. पावसाचा जोर चांगल्या प्रमाणात असल्याने नाशिक-पुणे महामार्गावरील रस्त्यावरून पाणी वाहत होते.
दिंडोरी : शहर व परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे भाजीपाला बाजारात व्यापारी व ग्राहकांची मोठी तारांबळ उडाली. दुपारी दीडच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली.
-----------------------------------
सिन्नर शहरासह तालुक्यात मान्सून पावसाचे आगमन
सिन्नर : शहरासह तालुक्यात सलग दोन दिवसांपासून पावसाने कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली. मान्सून पावसाचे तालुक्यात आगमन झाल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने यावर्षी तालुक्यात फारसी टंचाई जाणवली नाही. यावर्षी मान्सूनचे वेळेवर आगमन झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. गुरुवारी तालुक्याच्या पूर्व भागात पावसाने हजेरी लावली.
वावी, पांगरी, मिठसागरे, शहा, कहांडळवाडी या गावांमध्ये पाऊस झाला. शुक्रवारी दुपारी सिन्नर शहरासह मुसळगाव, ठाणगाव या गावांसह पश्चिम पट्ट्यात पाऊस झाला. शुक्रवारी सकाळपासून वातावरणात उकाडा जाणवत जाणवत होता. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास पावसाचे आगमन झाले. शेतकºयांनी खरीपपूर्व मशागतीची तयारी केली असून आता शेतकºयांना खरीप पेरणीचे वेध लागले आहे.
-----------------
वणी : शहर व परिसरात दुपारी २ वाजेच्या सुमारास जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. सुमारे एक तास झालेल्या या मुसळधार पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. दिंडोरी तालुक्यातील वणी, मुळाणे, चंडीकापूर मांदाणे, तळेगाव, औताळे, कृष्णागाव, मावडी, सोनजांब, खेडगाव, कोशिंबे, पुणेगाव, पांडाणे, अंबानेर, अहिवंतवाडी, चामदरी, गोलदरी, माळे दुमाला, काजी माळे, पिंपरखेड, परिसरात सायंकाळी झालेला पाऊस शेती मशागतीसाठी उपयुक्त असल्याने शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण आहे. या पावसाची गरजच होती, असे बोलले जात आहे.