मेशी, डोंगरगाव परिसरात जोरदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 11:57 PM2019-08-31T23:57:07+5:302019-08-31T23:57:29+5:30
मेशी : गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेल्या वरूणराजाने आज (31) रोजी सुमारे चार वाजता मेशीसह डोंगरगाव, निंबोळा महालपाटणे परिसरात जोरदार हजेरी लावली आहे.
मेशी : गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेल्या वरूणराजाने आज (31) रोजी सुमारे चार वाजता मेशीसह डोंगरगाव, निंबोळा महालपाटणे परिसरात जोरदार हजेरी लावली आहे.
खरीप हंगामातील पिके जोरदार आहेत अशातच गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने अचानक दडी मारली होती त्यामुळे खरीप हंगामातील पिके पावसाविना कोमेजू लागली होती. याशिवाय जोरदार पाऊस अद्याप पर्यंत झालेला नव्हता म्हणून विहिरींना पाणीच नव्हते. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
या पावसामुळे विहिरींना पाणी ऊतरणयास मदत होईल. तसेच रखडलेली कांदा लागवड आता जोमात सुरू होतील. या वर्षीच्या पिहलाच जोरदार पाऊस झाला आहे. कांदया च्या वाफयांमधये पाणी साचलेले आहे.