देशमाने परिसरात दमदार पावसाने खरीप पिकांना जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 05:33 PM2020-07-24T17:33:51+5:302020-07-24T17:34:14+5:30
देशमाने : परिसरात गत पंधरवाड्यापासून दडी मारलेल्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे.
देशमाने : परिसरात गत पंधरवाड्यापासून दडी मारलेल्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. श्रावण सरी ऐवजी धोधो कोसळणाऱ्या पावसाबद्दल शेतकरी वर्गात आश्चर्य व्यक्त होत आहे. परिसरात खरीप पिके पावसाअभावी सुकू लागली होती. सोयाबीन पिकाची दुबार पेरणीनंतर पावसाअभावी उगवण झालीच नाही. मका, बाजरी, मूग, कांद्याची रोपे पावसाअभावी सुकू लागली होती. गत तीन चार दिवसांपासून पाऊस सातत्याने हुलकावणी देत होता. मात्र गुरु वारी मध्यरात्रीनंतर सुमारे तासभर परिसरातील सर्वच गावामध्ये जोरदार हजेरी लावली. दमदार पावसामुळे खडकी नाल्यास पूर आला असून गावालगतच्या शेतातून वाहणार्?या पाण्यामुळे गोई नदीवरील शिवकालीन साठवण बंधारा भरला आहे.