भोजापूर खोऱ्यात पावसाचे दमदार आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:12 AM2021-07-16T04:12:23+5:302021-07-16T04:12:23+5:30
तालुक्यातील अनेक भागात पावसाअभावी पेरण्या रखडल्या होत्या तर काही भागात पिकांना पावसाची गरज होती. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ...
तालुक्यातील अनेक भागात पावसाअभावी पेरण्या रखडल्या होत्या तर काही भागात पिकांना पावसाची गरज होती. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वातावरणात उकाडा जाणवत होता. त्यामुळे सायंकाळी ५ वाजेनंतर पावसाचा जोर वाढला. भोजापूर खोरे परिसरातील चास, नळवाडी, कासारवाडी व सोनेवाडी आदी भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतात पाणी साचून तळ्याचे स्वरूप आले होते. भोजापूर खोरे हा बागायती परिसर असलेल्या भागात मोठ्या प्रमाणात भाजीपाला व नगदी पिके घेतली जातात. तसेच डाळिंब, ऊस, द्राक्ष, टोमॅटो, वांगी आदींसह खरीप हंगामातील पिकांना प्राधान्य दिले जाते. जोरदार पाऊस झालेल्या अनेक ठिकाणी शेतातील पिके पाण्याखाली गेली होती.
इन्फो
भाजीपाला विक्रेत्यांची धावपळ
नांदूरशिंगोटे येथे व परिसरातही पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. सायंकाळी सहाच्या दरम्यान पावसाने जोरदार सुरुवात केली. ३५ ते ४० मिनिटे सलग पाऊस झाला. नंतर काहीवेळ रिमझिम सुरू होती. महामार्गाच्या रस्त्यांवरून पावसाचे पाणी वाहिले. सखल भागातही पाणी साचले होते. दुकाने बंद करण्याच्या वेळेलाच पाऊस सुरू झाला. त्यामुळे व्यापारी व ग्राहकांची एकच तारांबळ उडाली. रस्त्यावरील भाजीपाला व अन्य विक्रेत्यांची एकच धावपळ उडाली.
फोटो- १५ भोजापूर रेन
150721\15nsk_37_15072021_13.jpg
फोटो- १५ भोजापूर रेन