चांदोरी, खेरवाडी भागात पावसाची जोरदार हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 09:03 PM2021-09-26T21:03:00+5:302021-09-26T21:05:07+5:30

चांदोरी : चांदोरीसह पंचक्रोशीतील गावात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मागील आठवड्यात पावसाला चांगलीच सुरवात झाली होती व चार ...

Heavy rains in Chandori, Kherwadi area | चांदोरी, खेरवाडी भागात पावसाची जोरदार हजेरी

चांदोरी, खेरवाडी भागात पावसाची जोरदार हजेरी

Next
ठळक मुद्देखेरवाडी-ओझर वाहतूक खोळंबली : ओहोळ व नाले भरले तुडुंब

चांदोरी : चांदोरीसह पंचक्रोशीतील गावात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मागील आठवड्यात पावसाला चांगलीच सुरवात झाली होती व चार दिवसांचा विश्रांती नंतर रविवारी (दि.२६) पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

जोरदार झालेल्या पावसाने ओहोळ व नाले तुडुंब भरून वाहू लागले व शेतात पाणी साचले आहे. रविवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास पावसाला सुरवात झाली. सलग ३ तास दमदार हजेरी लावली.
आज झालेल्या पावसाने सोयाबीनच्या शेतात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

खेरवाडी-ओझर पूल पाण्याखाली

खेरवाडी, ओझर, पिंपरी, आडगाव या भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नाले व ओहोळ दुथडी भरून लागल्याने अनेक शिव रस्ते व गाव रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक काही काळ खोळंबली होती. खेरवाडी येथे रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने नागरिकांना पर्यायी भुयारी रस्ता सुरू करण्यात आला आहे. मात्र नाले ,ओहोळ दुथडी भरून वाहू लागल्याने भुयारी मार्गात पाणी साचल्याने वाहतूक ओझरकडे जाणारी वाहतूक खोळंबली होती.
(२६ चांदोरी २)

पुलाखाली साचलेले पाणी.

Web Title: Heavy rains in Chandori, Kherwadi area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.