जिल्ह्यात वादळी पावसाचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:12 AM2021-06-04T04:12:45+5:302021-06-04T04:12:45+5:30
दुपारनंतर ४ वाजेच्या दरम्यान पावसाला सुरुवात झाली. हळूहळू पावसाचा आणि वाऱ्याचा जोर वाढत जाऊन तुफान वृष्टी झाल्याने येथील जिल्हा ...
दुपारनंतर ४ वाजेच्या दरम्यान पावसाला सुरुवात झाली. हळूहळू पावसाचा आणि वाऱ्याचा जोर वाढत जाऊन तुफान वृष्टी झाल्याने येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक दोनचे पाठीमागील बाजूचे संपूर्ण पत्रे उडाले, तर पोलीस ठाण्याजवळील इमरान शेख यांच्या इमारतीवरील पत्र्याचे छप्पर पूर्णपणे उखडले गेले. पंचायत समितीचे सोलर निकृष्ट फाउंडेशनमुळे उखडून नुकसान झाले. पालविहीर फाट्याजवळ एका घराचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला, तर विजेच्या भरवशावर असलेली बीएसएनएलची मोबाइल सेवा नेहमीप्रमाणे बंद पडली.
-------------------------------------
करंजाळीत आंब्याचे नुकसान
पेठ : दोन दिवसांपासून करंजाळीसह पेठ तालुक्यात झालेल्या वादळी पावसामुळे ऐन उतरणीला आलेल्या आंब्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने आंबा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.
गुरुवारी दुपारनंतर प्रचंड मेघगर्जनेनंतर वादळी पावसाने हापूस, केशर, राजापुरी, तोतापुरी सारखे विविध प्रजातींचे आंबे झडले गेल्याने शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान झाले आहे. एकीकडे कोरोनामुळे आंबा विक्री होईल की नाही अशी भीती असताना आता वादळाने काढणी पूर्वीच नुकसान केल्याने आंबा उत्पादक शेतकरी संकटात सापडला असल्याचे सेंद्रिय आंबा उत्पादक यशवंत गावंडे यांनी सांगितले.
-------------------------
त्र्यंबकला दमदार हजेरी
त्र्यंबकेश्वर : सलग तिसऱ्या दिवशी गुरुवारी रोहिणीच्या पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे बळीराजा सुखावला असून, मशागतीला वेग आला आहे. पावसाने पूरसदृश स्थिती निर्माण झाल्याने नगर परिषदेची पावसाळा पूर्व नालेसफाईचे पितळ उघडे पडले. दरम्यान, पावसामुळे काहीकाळ जनजीवन विस्कळीत झाले होते.
फोटो- ०३ सुरगाणा रेन
सुरगाणा येथे एका इमारती वरील उखडलेले छप्पर.
फोटो- ०३ सुरगाणा रेन१
सुरगाणा येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक दोनचे उडालेले पत्रे.
===Photopath===
030621\03nsk_50_03062021_13.jpg~030621\03nsk_51_03062021_13.jpg
===Caption===
फोटो- ०३ सुरगाणा रेन सुरगाणा येथे एका इमारती वरील उखडलेले छप्पर.~फोटो- ०३ सुरगाणा रेन१सुरगाणा येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक दोनचे उडालेले पत्रे.