वादळी पावसामुळे १५०० हेक्टरवरील मका पिकाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 04:23 PM2020-08-24T16:23:17+5:302020-08-24T16:26:02+5:30

कळवण : तालुक्यात वादळी पावसामुळे जवळपास १५०० हेक्टर क्षेत्रावरील मका पीक भुईसपाट झाले. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी तत्काळ मकाबाधित क्षेत्रातील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Heavy rains hit maize crop on 1500 hectares | वादळी पावसामुळे १५०० हेक्टरवरील मका पिकाला फटका

वादळी पावसामुळे १५०० हेक्टरवरील मका पिकाला फटका

Next
ठळक मुद्देपुनंद व चणकापूरचे जलपूजन

कळवण : तालुक्यात वादळी पावसामुळे जवळपास १५०० हेक्टर क्षेत्रावरील मका पीक भुईसपाट झाले. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी तत्काळ मकाबाधित क्षेत्रातील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
आमदार नितीन पवार यांनी तालुक्यातील बाधित गावांतील मका पिकाची शेतात व बांधावर जाऊन पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला व नुकसानीची माहिती घेतली. तालुक्यातील मका पिकाच्या नुकसानीचे महसूल व कृषी विभागाने वस्तुनिष्ठ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी आमदार पवार यांनी जिल्हाधिकाºयांकडे दोन दिवसांपूर्वी केली होती. तालुक्यातील बाधित गावांतील मका पिकाचे सविस्तर आणि वस्तुनिष्ठ पंचनामे झाल्यानंतर जास्तीतजास्त नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचेआश्वासन पवार यांनी पहाणी दौºयात शेतकºयांना दिले होते. तहसीलदार बी. ए. कापसे, उपविभागीय कृषी अधिकारी कैलास खैरनार, गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम, तालुका कृषी अधिकारी विजय पाटील, कृषी विज्ञान केंद्राचे रूपेश खेडकर, जिल्हा परिषद सदस्य यशवंत गवळी, पंचायत समिती सभापती मीनाक्षी भोये, उपसभापती विजय शिरसाठ, राष्टÑवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे यांनी तालुक्यातील आठबे, सादडविहीर, कन्हेरवाडी, नरूळ, ओतूर, कुंडाणे, शिरसमणी, कळवण खुर्द, पिळकोस, चाचेर, भादवन, बिजोरे, ककाणे, मोकभणगी, गणोरे, शेरी, भैताणे, काठरे, सुपले, खडकी जयदर, जयदर, कोसवन, वेरुळे, करंभेळ, वडाळा, देवळीकराड, मोहपाडा, चणकापूर येथे जाऊन शेतकºयांशी संवाद साधला. वडेल येथील कृषी विज्ञान केंद्राचे रूपेश खेडकर यांनी मका व सोयाबीन नुकसानीसंदर्भात मार्गदर्शन केले. पाहणी दौºयात राजेंद्र्र भामरे, संतोष देशमुख, सुनील देवरे, विलास रौंदळ, शिवाजी चौरे, बाळासाहेब शेवाळे, हिरामण वाघ, संदीप वाघ, प्रल्हाद गुंजाळ, पंकज जाधव, शांताराम जाधव यांच्यासह शासकीय अधिकारी, कमर्चारी सहभागी झाले होते.

पुनंद व चणकापूरचे जलपूजन
तालुक्यात गेल्या आठवड्यापासून पावसाची रिपरिप सुरू असल्यामुळे चणकापूर आणि पुनंद धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत असून, पुनंद व गिरणा नदीला व चणकापूर उजव्या कालव्याला पूरपाणी सोडण्यात आले आहे. चणकापूर व पुनंद धरणाच्या पातळीत वाढ झाल्याने आमदार नितीन पवार व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार यांनी सपत्निक जलपूजन केले. यावेळी नारायण हिरे, लालाजी जाधव, रघू महाजन उपस्थित होते.
 

Web Title: Heavy rains hit maize crop on 1500 hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.