मुसळधार पावसाचा भाताला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 12:24 AM2020-10-17T00:24:48+5:302020-10-17T00:25:33+5:30
इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, नांदगाव बुद्रूक, बेलगाव कुऱ्हे, जानोरी, साकूर तसेच बेलगाव तऱ्हाळे, पिंपळगाव मोर, देवळा, घोटी, शेवगेडांग आदी भागात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भातपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. याचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशा मागणी इगतपुरी पंचायत समितीचे माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे यांच्यासह शेतकरी करीत आहे.
घोटी/नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, नांदगाव बुद्रूक, बेलगाव कुऱ्हे, जानोरी, साकूर तसेच बेलगाव तऱ्हाळे, पिंपळगाव मोर, देवळा, घोटी, शेवगेडांग आदी भागात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भातपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. याचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशा मागणी इगतपुरी पंचायत समितीचे माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे यांच्यासह शेतकरी करीत आहे.
याच पार्श्वभूमीवर आमदार हिरामण खोसकर यांनी नुकसानभरपाईसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असून, एकही नुकसानग्रस्त शेतकरी नुकसान भरपाई मिळण्या पासून वंचित राहणार नाही, असे आश्वासन दिले आहे.
दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन, भात, ऊस, भुईमूग, मका आदी पिकांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे येथील शेतकऱ्यांसमोर मोठे संकट कोसळले आहे. या पिकांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी आमदार खोसकर तसेच नागरिकांनी केली होती. नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, नांदगाव बुद्रूक, बेलगाव कुऱ्हे, मुरंबी, सांजेगाव या भागात जोरदार पाऊस झाल्यामुळे भातशेती पाण्यात गेली असून, सर्व पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.