इगतपुरी तालुक्यात पावसाची दमदार हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 12:46 AM2021-07-25T00:46:03+5:302021-07-25T00:46:31+5:30

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यात जवळपास महिनाभराच्या दीर्घ विश्रांतीनंतर रविवारपासून पहिल्यांदाच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे. गतवर्षीच्या तुलनेत शनिवारी (दि.२४) झालेला पाऊसही कमी आहे.

Heavy rains in Igatpuri taluka | इगतपुरी तालुक्यात पावसाची दमदार हजेरी

इगतपुरी तालुक्यात पावसाची दमदार हजेरी

Next
ठळक मुद्देखोळंबलेल्या शेतीकामांना वेग : चोवीस तासात २२२ मिमी पाऊस

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यात जवळपास महिनाभराच्या दीर्घ विश्रांतीनंतर रविवारपासून पहिल्यांदाच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे. गतवर्षीच्या तुलनेत शनिवारी (दि.२४) झालेला पाऊसही कमी आहे. गतवर्षीच्या पावसात तालुक्यातील धरणामध्ये अर्ध्याहून अधिक साठा होता. यावर्षी अजून अर्ध्याहून खालीच साठा आहे. गतवर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात १३०७ मिमी पाऊस झाला होता, तर यावर्षी सरासरी १११३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

गेल्या महिनाभरापासून गायब असलेल्या वरुणराजाने गेल्या तीन दिवसांपासून तालुक्यात सर्वत्र दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे.
तालुक्यात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू झाल्याने संततधार पावसामुळे ग्रामीण भागात काहीसे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या चोवीस तासात २२२ मिमी पावसाची विक्रमी नोंद झाली आहे, तर दिलासादायक बाब म्हणजे पावसाने इगतपुरी तालुक्यात हजारी गाठली असून, आतापर्यंत १११३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या दमदार पावसाने धरणसाठ्यांमध्येही थोडक्यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे इगतपुरीच्या पूर्व भागातील दुबार पेरणीला आलेल्या भात रोपांना नवसंजीवनी मिळाली ाआहे. शेतकऱ्यांचे दुबार पेरणीचे संकट टळले आहे. दरम्यान, बळीराजा शेतातील भात रोपांना खते, शेत मशागत करण्यात व्यस्त आहे.

पूर्व भागातून मोठ्या प्रमाणात मजूरवर्ग भात लागवडीसाठी इगतपुरी, आडवन, दौंडत, घोटी, वैतरणा भागात जाताना दिसत आहे. तर यंदा पूर्व भागातील नदी, नाले जुलैच्या शेवटाला वाहताना दिसत आहे. जून-जुलै हे दोन महिने उलटूनही टाकेद येथील कडवा नदीपात्र कोरडेठाक होते. मात्र तीन -चार दिवसांपासून पावसाने परिसरात जोर धरल्याने कडवा नदी वाहू लागली आहे.

यंदा इंधनाचे (डिझेलचे) दर वाढल्याने भातशेती मशागतीसाठी, शेतातील भात लागवडीसाठी, शेतकऱ्यांना गाळ तयार करण्यासाठी ट्रॅक्टरला ९०० रुपये प्रतितासाप्रमाणे तर बैलजोडी औतासाठी १५०० रुपये पूर्ण दिवसाला शेती वाहणीसाठी द्यावे लागत आहे. तर दोन-तीन दिवसांपासून पूर्व भागात सर्रासपणे विजेचा लपंडाव सुरू असल्याने डिझेल इंजिनच्या साह्याने शेतकऱ्यांना शेतात पाणी भरावे लागत आहे.


धरणातील गतवर्षी आणि यंदाचा पाणीसाठा टक्केवारीच्या तुलनेत :
दारणा ४८.६६ टक्के
भावली ६६.६३ टक्के
भाम १५.१७ टक्के
वाकी १.६९ टक्के
वालदेवी ६६.५८ टक्के
मुकणे २४.३ टक्के
गतवर्षी - यावर्षी
१३०७ मिमी - १११३ मिमी
दारणा ४०९१ दलघफू - ३४७६
भावली १०५१ - दलघफू ८९८
वाकी २३ - दलघफू ४२
मुकणे १९३९ - दलघफू १७२५
कडवा ३११ दलघफू - २२८
भाम ६५४ - दलघफू ३७४.

Web Title: Heavy rains in Igatpuri taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.