दिंडोरी तालुक्यात पावसांची जोरदार बॅटिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2022 01:39 AM2022-07-11T01:39:57+5:302022-07-11T01:40:16+5:30
दिंडोरी तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या तीन दिवसांत पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे जनजीवन ठप्प झाले आहे.
दिंडोरी/लखमापूर : दिंडोरी तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या तीन दिवसांत पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे जनजीवन ठप्प झाले आहे.
या पावसामुळे तालुक्यातील धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत असून, पालखेड धरण ४८ टक्के भरले असून, धरणातून कादवा नदीच्या पात्रता ६९२० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे कादवा पात्रालगत असणाऱ्या गावांना प्रशासनांकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
दिंडोरी तालुक्यांच्या सर्वच भागांमध्ये सध्या पावसांची जोरदार बॅटिंग सुरू असल्यामुळे करजंवण धरणांतील पाणीसाठा ११ टक्क्यांवरून २३ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे, तर वाघाड धरण ५ टक्क्यांवरून ३० टक्क्यांवर पोहोचले आहे. तर पुणेगाव १० टक्के असताना ते आजमितीला १९ टक्के भरले आहे. ओझरखेड धरणांचा पाणीसाठा २८ टक्के इतका झाला आहे, तर तीसगाव धरण साठ्यात मात्र अजून कुठलीच वाढ झाली नाही.
.........कोट.......
पालखेड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने धरण द्वारपरिचलन पातळी पूर्ण झाल्याने व पाण्याची आवक वाढल्यामुळे सकाळी १० वा. पालखेड धरणांतून विसर्ग वाढवून ६९२० क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. पावसाचा जोर टिकून राहिल्यास टप्प्याटप्प्याने यात वाढ करण्यात येईल.
..सुदर्शन सानप (शाखा अभियंता पालखेड धरण)