नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस; चार धरणांमधून विसर्ग सुरू 

By Sandeep.bhalerao | Published: September 8, 2023 03:07 PM2023-09-08T15:07:23+5:302023-09-08T15:08:24+5:30

नांदुरमध्यमेश्वर धरणामधील विसर्ग सकाळी वाढविण्यात आला आहे.

heavy rains in nashik district discharge from four dams begins | नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस; चार धरणांमधून विसर्ग सुरू 

नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस; चार धरणांमधून विसर्ग सुरू 

googlenewsNext

संदीप भालेराव, नाशिक: दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेल्या नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि.८) सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे नाशिककरांना दिलासा मिळाला. पावसामुळे अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली तर नाशिक शहरातील रस्ते जलमय झाले होते. गोदावरी नदीत बस अडकल्याने बस पाण्याबाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यातील चार धरणांमधून विसर्ग वाढविण्यात आला आहे. 

नांदुरमध्यमेश्वर धरणामधील विसर्ग सकाळी वाढविण्यात आला आहे. दुपारपर्यंत या धरणातून ३०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. कडवा धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने कडवा धरणातूनही १६९६ इतका विसर्ग वाढविण्यात आला आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत या ठिकाणी ८४८ क्युसेक इतका विसर्ग सुरू होता. पालखेडच्या धरण सुमहात तसेच इतरही सर्वच क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असल्याने कोळवण नदीला आलेल्या पुरामुळे धरणातून २००० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे कादवा नदीवरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 
  आळंदी पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग केला जाणार असल्याने नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गंगापूर धरणातूनही १०४० क्युसेक विसिर्ग करण्यात येत असल्याने गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.

Web Title: heavy rains in nashik district discharge from four dams begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.